Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / जिल्हा परिषद प्राथमिक...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडद येथे वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडद येथे वार्षिक स्नेहसंमेलन महोत्सव संपन्न.

झरी: मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडद येथे सर्व विद्यार्थी , पालक तसेच मान्यवर व ग्रामवासीयांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. त्यानिमित्य आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .सर्व विद्यार्थी तसेच पालक आणि सर्व ग्रामवासीयांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले . उपस्थिती दर्शवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे  योगदान दिले .

आनंद मेळावा सायंकाळी  3.00 ते 5.00 वाजता दरम्यान आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी पदार्थ बनवून स्टॉल लावले . यासाठी महिलांनी मुलांना मदत केली . पदार्थाचे नाव व किंमतीचे बोर्ड लावण्यात आले. सर्व पालक आणि ग्रामवासी यांनी पदार्थ खरेदी करून आस्वाद घेतला . विद्यार्थ्यांना व्यवहार करण्याची संधी मिळाली. सर्वांनी भरभरून आनंद घेतला . स्वतः व्यवहार करून केलेल्या कमाईचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होता .

 सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ठिक ८ . 00 वाजता घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष , उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली . संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष आणि सदस्य तसेच संरपंच , उपसरपंच सर्व सदस्यगण , पोलीस पाटील , अध्यक्ष तंटा मुक्ती समिती व समस्त ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली .

आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य , नाटक , आणि गीत गायन इत्यादी कला प्रकार सादर केले . पालकांनी मुलांच्या डॉन्स साठी तयारी करण्यासाठी मदत केली . आपण सर्व ग्रामवासीयांनी उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन दिले भरघोस बक्षिसे दिली . त्यांचा आनंद द्विगुणित केला .     

ताज्या बातम्या

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न* 24 February, 2024

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न*

घुगुस:-भारतीय कोयला खदान मजदूर संघ (भा.म.सं.) वणी-ताडाली एवं मानव संसाधन विकास विभाग नागपुर के अंतर्गत क्षेत्रीय...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* 24 February, 2024

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* ✍️राजू गोरे शिरपूर शिरपूर:-दिनांक 19 फरवरी रोजी सायंकाळी...

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या . 23 February, 2024

शंकरपटाची सांगता, लखन व जलवा जोडी ठरली अव्वल, गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक, अखेरच्या दिवशी धावल्या 100 पेक्षा अधिक जोड्या .

वणी - शहरातील जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व...

परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप, स्माईल फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम. 23 February, 2024

परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप, स्माईल फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम.

वणीः स्माईल फाउंडेशन ही संस्था विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. याचाच एक भाग म्हणून जेईई, नीट, सीईटी आदी परीक्षार्थ्यांना...

झरी-जामणीतील बातम्या

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

झरी: तालुक्यातील शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज दिनांक 22 फेब्रुवारी,2022...

मुकुटबन येथे 75 वर्षावरील व 80 वर्षावरील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार समारंभ सम्पन्न

झरी: श्रीराम मंदीर सभागृह मुकुटबन येथे के. जी. टू. पी. जी पेन्शनर्स असोसिएशन तर्फे 75 वर्षावरील व 80 वर्षावरील सेवानिवृत्त...

वेदड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

झरी जामनी: शिवजमोत्सव निमित्य 19 फेब्रु २०२४ रोजी क्रांतिसुर्य बहुुद्देशीय संस्था वेडद व छ.शिवाजी महाराज नवयुवक वेडद...