Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / भावी पिढीच्या भवितव्यासाठी...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

भावी पिढीच्या भवितव्यासाठी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने एल्गार मोर्चात सहभागी व्हावे.

भावी पिढीच्या भवितव्यासाठी ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने एल्गार मोर्चात सहभागी व्हावे.
ads images

OBC ( VJ,NT,SBC ) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी - मारेगाव - झरी यांनी केले आवाहन,मुकुटबन येथे सम्पन्न झाली ओबीसी बांधवांची आढावा बैठक

झरी:- शासनाने मागील अनेक वर्षापासून मागणी करीत असलेल्या ओबीसीच्या जातनिहाय जनगणेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहेत . त्याचबरोबर मराठा समाजाला अध्यादेश काढून सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याचा घाट घातला आहे . तरी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये व ओबिसि प्रवर्गाची बिहार प्रमाणे जातनिहाय जनगणना करावी . हया दोन प्रमुख मागण्या व इतर अठरा मागण्यांसाठी  OBC ( VJ,NT,SBC) जातनिहाय जनगणना कृती समितीने दिनांक 11 फेब्रुवारी 2024 ला " उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी " वर "   एल्गार मोर्चा पुकारून रणशिंग फुंकले आहेत . ओबीसी समाजाला सन 1990 पासून फार उशिरा शासनाने आरक्षण लागू केले आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक , नोकरीत अजूनही पूर्ण वाटा दिला जात नाही . ओबीसी साठी विविध उपाययोजना करताना  केंद्र व राज्य सरकार ओबीसींची नक्की संख्या किती ही आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध नाही असे कारण सरकार वारंवार पुढे करतात . त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी , कर्मचारी व शेतकरी , शेतमजूर यांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत . या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व राज्य सरकार व केंद्र सरकार समोर समस्या मांडण्यासाठी तसेच बिहारच्या धर्तीवर ओबीसींची जात निहाय जनगणना करण्यासाठी OBC ( VJ,NT,SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी - मारेगव - झरी. जि यवतमाळ च्या वतीने " एल्गार मोर्चा " चे आयोजन दि 11 फेब्रू 2024 ला दु 12: 00 वा केलेले आहेत .

     हया मोर्चात ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या सर्व जात समूहाचे बांधव सहभागी होणार आहेत . शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथे सर्व ओबीसी बांधव गोळा झाल्यानंतर पुरुष व महिलांचे रॅली सदृश रांगेत मोर्चाला प्रारंभ होईल . अत्यंत शांततेत व विविध घोषणा देत मोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठेत फिरून शासन, प्रशासनाचे लक्ष वेधणार आहेत . तर मोर्चात विविध महामानव , महा नायिका यांचे कट आउट लावून तसेच विविध जयघोष देण्यात येणार आहेत. ओबीसी , व्हिजे , एन टी, एसबिसी प्रवर्गात समावेश होणाऱ्या विविध जात समूहाचे नृत्य, पेहराव , व्यावसायिक देखावे तयार करून ओबीसी बांधवांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत . त्याचबरोबर लेझीम पथके, बँड बाजा , डफळे , लाठी काठीचे सादरीकरण रॅली दरम्यान करण्यात येणार आहेत . संपूर्ण शहरभर फिरल्यानंतर शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ वणी येथे मोर्चाची सांगता होईल . त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत होईल . सभेच्या ठिकाणी मा . प्रा. डॉ लक्ष्मण यादव ( प्रसिद्ध वक्ते तथा ओबीसी विचारवंत , दिल्ली ) मार्गदर्शन करणार आहेत . साधारणता पंधरा ते वीस हजार ओबीसी प्रवर्गातील विविध जात समूहाचे समाज बांधव मोर्चात सहभागी होणार आहेत . याच मोर्चाच्या संदर्भात काल शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी मुकुतबन येथे ओबीसी बांधवांची आढावा बैठक घेण्यात आली. तरी भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी आपणही मागे न राहता " एल्गार मोर्चा " वणी येथे सहभागी व्हावे असे आवाहन OBC ( VJ,NT,SBC ) जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप बोनगिरवार , निमंत्रक मोहन हरडे ,  आशिष साबरे, नेताजी पारखी, अनिल टोंगे, रफीकभाई कनोजे, स्वप्नील पाइलवार,राजेश अक्केवार,नितेश भालेराव,विपीन वडके, केतन ठाकरे, आनंदराव गोहणे, संतोष देशमुख, विलास चित्तलवार, चंद्रशेखर वैद्य, रहीमखा पठाण, शशिकांत लक्षणे,नारायण गोडे,सौ ममता पारखी,रामदास पाइलवार, संदीप विच्चू,संतोष कुरमेलवार,विजय पिंपळशेंडे,मुरलीधर नाकले, तुळशीदास आवारी व OBC ( VJ,NT,SBC ) जातनिहाय जनगणना कृती समितिचे सर्व समन्वयक, सदस्य वणी - मारेगाव - झरी यांनी केलेले आहेत .

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

झरी-जामणीतील बातम्या

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

बापरे! रेशनच्या दुकानात आढळला चक्क प्लास्टिकचा तांदूळ

झरी: तालुक्यातील मांगली येथील रेशन धान्य दुकानातून लाभार्थ्यांना दिलेल्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ आढळून आल्याने...

मांगली येथील वार्ड क्रमांक 2 मधील रहिवासी विजय काकडे यांच्या घरासमोरील रस्ता झाला चिखलमय

झरी: तालुक्यातील ग्रामपंचायत मांगली येथील वार्ड क्रमांक 2 येथील रहिवासी विजय काकडे यांच्या घरासमोरील रस्ता झाला हा...