*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
Reg No. MH-36-0010493
वणी - जुनाडा लगत वर्धा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तीन वर्ष झाले आहे. पूल झाल्याने वणी ते भद्रावती (मार्गे जुनाडा, तेलवासा) हे अंतर 20 ते 25 किलोमीटरने कमी झाले आहे. मात्र पुल झाला असला तरी या मार्गाचे अद्याप बांधकाम न झाल्याने हा मार्ग अद्यापही वापरण्याजोगा नाही. त्यामुळे या मार्गाचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी उकणीचे माजी सरपंच संजय रामचंद्र खाडे व उकणीच्या माजी संरपंच संगीता संजय खाडे यांनी रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जुनाडा लगत वर्धा नदीवर करोडो रुपये खर्च करुन पुलाचे बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम पूर्ण होऊन सुमारे 3 वर्ष लोटली आहे. मात्र रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण झालेले नाही. शिवाय रोड लगतची जमिन संपादित करण्याची प्रक्रिया कासव गतीने सुरु आहे. त्यामुळे पूल होऊन तब्बल 3 वर्ष लोटूनही या पुलाचा कोणत्याही प्रवाशांना फायदा होत नसून हा महत्त्वाचा पूल केवळ शोभेची वास्तू झाला आहे.
वणी ते निळापूर, बोरगाव, जुनाडा, तेलवासा, भद्रावती जाणारा रस्ता तात्काळ पूर्ण झाल्यास वणीहून भद्रावतीचे अंतर 20 ते 25 कि.मी. कमी होईल. त्यामुळे वेळ व पैसा वाचेल. तसेच या पुलाचा वणी व परिसरातील गावक-यांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या रोडचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावे, या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देते वेळी संजय खाडे, पुरुषोत्तम आवारी, राजाभाऊ पाथ्रडकर, जयसिंग पाटील गोहोकर, प्रमोद वासेकर, सुनील वरारकर, प्रा. शंकर व-हाटे, महेश पावडे, तेजराज बोढे, बंडू मालेकर इत्यादी उपस्थित होते.
*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...
*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...
वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...
वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...
वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...