Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / तरुणाईने मैदानी खेळाला...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

तरुणाईने मैदानी खेळाला प्राधान्य द्यावे - संजय खाडे

तरुणाईने मैदानी खेळाला प्राधान्य द्यावे - संजय खाडे

घोन्सा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन.

वणी - आजच्या ऑनलाईन युगात तरुणाई मैदानी खेळाऐवजी मोबाईलच्या गेमला प्राधान्य देत आहे. यामुळे शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्याकडेही दुर्लक्ष होत आहे. व्हॉलिबॉल हा चपळाईचा खेळ आहे. या खेळामुळे आरोग्यच चांगले राहत नाही तर चपळताही येतो. त्यामुळे व्हॉलिबॉलचा अधिकाधिक प्रसार व्हायला हवा, असे मनोगत कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांनी व्यक्त केले. घोन्सा येथील आदर्श हायस्कूलच्या पटांगणात 9 फेब्रुवारी रोजी दुपारी व्हॉलीबॉल तुर्नामेन्टचे (डायरेक्ट रट्टा) उद्घाटन झाले. या प्रसंगी उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. 

या कार्यक्रमाला जयसिंग गोहोकर हे अध्यक्ष होते. तर प्राचार्य गोहूरकर, मंगेश मोहुर्ले, विजय जीवने, सचिन उपरे,  डॉ.शंकर व-हाटे, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, राजेंद्र कोरडे, अशोक नागभिडकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तुर्नामेंटमध्ये 62 हजारांच्या बक्षिसांची लयलूट आहे. यात प्रथम बक्षीस 21 हजार, दुसरे बक्षीस 15 हजार, तिसरे बक्षीस 11 हजार, चौथे बक्षीस 7 हजार, पाचवे बक्षीस 5 हजार, तर सहावे बक्षीस 3 हजार रुपये आहे. याशिवाय इतर वैयक्तिक बक्षिस देखील ठेवण्यात आले आहे. 

तुर्नामेंटसाठी पांढरकवडा, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, पुसद, सोलापूर यासह गुजरात, हरियाणा येथील टीम सहभागी झाली आहेत. सदर सामने हे दिवस रात्र होणार आहे. घोन्सा येथील शिवराय मित्र मंडळ व घोन्सा ग्रामवासी यांच्या तर्फे या तुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य आणि घोन्सा ग्रामवासी परिश्रम घेत आहे.

ताज्या बातम्या

*रोटरीचे उपक्रम वाखावण्याजोगे: रोटरीने ग्रामीण भागासाठीही पुढाकार घ्यावा : आमदार सुभाष धोटे* 24 February, 2024

*रोटरीचे उपक्रम वाखावण्याजोगे: रोटरीने ग्रामीण भागासाठीही पुढाकार घ्यावा : आमदार सुभाष धोटे*

*रोटरीचे उपक्रम वाखावण्याजोगे: रोटरीने ग्रामीण भागासाठीही पुढाकार घ्यावा : आमदार सुभाष धोटे* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या 24 February, 2024

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न* 24 February, 2024

बीएमएस का 22और 23 फरवरी2024 को दो दिवसीय अभ्यास वर्ग सम्पन्न*

घुगुस:-भारतीय कोयला खदान मजदूर संघ (भा.म.सं.) वणी-ताडाली एवं मानव संसाधन विकास विभाग नागपुर के अंतर्गत क्षेत्रीय...

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* 24 February, 2024

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव*

*शिंदोला येथे 148 वा वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज जयंती महोत्सव* ✍️ राजू गोरे शिरपूर शिरपूर:- दि. 23 फरवरी रोजी दरवर्षीप्रमाणे...

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* 24 February, 2024

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न*

*मार्डी येथे मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव संपन्न* ✍️राजू गोरे शिरपूर शिरपूर:-दिनांक 19 फरवरी रोजी सायंकाळी...

वणीतील बातम्या