Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / शेतकरी विकास विद्यालय...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

शेतकरी विकास विद्यालय मांगली येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

शेतकरी विकास विद्यालय मांगली  येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप  समारंभ
ads images

झरी: तालुक्यातील शेतकरी विकास विद्यालय मांगली  येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप  समारंभ आज दिनांक 22 फेब्रुवारी,2022 रोज गुरुवार ला सम्पन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शशांक मुत्यलवार सर तर प्रमुख अतिथी म्हणून श्री .पारखी सर श्री . चिट्टलवार सर श्री. नाकले सर श्री . चामाटे सर श्री . काळे सर उपस्थित होते .प्रास्ताविक विचार चामाटे सर यांनी केले . त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली .

शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार  शिक्षक सदा करत असतो . त्यांचा सर्वांना आयुष्यात खूप उपयोग होतो . आपण विद्यार्थी सुसंस्कारीत होत असताना शिक्षकांना विसरू नका असे प्रतिपादन श्री . चिट्टलवार सरांनी आपल्या विचारातून मांडले .

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वंय शिस्त,कष्ट व वेळेचे नियोजन गरजेचे असते असे मु . मुत्य लवार सरांनी अध्यक्षीय विचारातून मांडले . सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता ९वी ची कु .तनवी वाघाडे तसेच आभार प्रदर्शन कु . श्रेया निखार यांनी पार पाडले .कार्यक्रमानंतर स्नेहभोजन पार पडले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवक विनोद भादीकर व जनार्धन काटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

ads images

ताज्या बातम्या

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

झरी-जामणीतील बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल

झरी जामनी: मुकुटबन बस थांबा पाडल्यामुळे प्रवाशाचे आतोनात हाल होत आहे.मे महिन्यात भर उन्हात प्रवाशांना उभे रहावे लागत...

आधी लग्न लोकशाहिचं मग माझं-प्रवीण बोधे

झरी: आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी अडेगाव येथील नवरदेव प्रवीण बोधे यांचा आज कोरपना येथे विवाह होता.आजच लोकसभेचे...