Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / परीक्षार्थ्यांना मोफत...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप, स्माईल फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम.

परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप, स्माईल फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम.
ads images

वणीः स्माईल फाउंडेशन ही संस्था विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. याचाच एक भाग म्हणून जेईई, नीट, सीईटी आदी परीक्षार्थ्यांना उपयुक्त पुस्तकांचे वितरण स्माईल फाउंडेशनने केले. यासाठी प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यात अग्रेसर किरण दिकुंडवार यांनी ही जबाबदारी उचलली. त्यांनी स्वखर्चाने ही सर्व पुस्तकं उपलब्ध करून दिलीत.

पुस्तक वितरणाचा सोहळा एस.पी.एम. शाळेजवळील वॉटर सप्लाय कार्यालयात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण दिकुंडवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी स्माईल फाउंडेशनचे आभार मानले. या सोहळ्यात जवळपास 20 निवडक विद्यार्थ्यांना जवळपास 31 हजार रूपयांची पुस्तके वर्षभराकरिता वितरीत झालीत. त्यानंतर ही पुस्तके नवीन विद्यार्थ्यांना दिली जातील. किरण दिकुंडवार हे नेहमीच स्माईल फाउंडेशनला विविध स्वरूपांत सहकार्य करत असतात. भविष्यातही विविध उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. त्यांच्याच सहकार्यामुळं हा छोटेखानी सोहळा उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची ही पुस्तके खरेदी करण्याची क्षमता नाही, अशांना यात प्राधान्य देण्यात आले. स्माईल फाउंडेशनची स्वतःची बूक बँक आहे. या योजनेअंतर्गत पुस्तकांची देवाणघेवाण होते. गरजूंना कपडे वाटप, पुस्तक वाटप, सायकल वाटप, ज्येष्ठांना काठी वाटप असे संस्थेचे उपक्रम सुरूच असतात. संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव यांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी जी मदत करता येईल ती करण्याची विनंती केली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल आत्राम, आदर्श दाढे, गौरव कोरडे यांनी विशेष परिश्रम घेतलेत.

ads images

ताज्या बातम्या

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा 18 April, 2024

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा

वणी :- धनोजे कुणबी समाज संस्था, वणी रजिस्टर क्रमांक ८६५६ (य) ३०२ / २०२४ यांनी इंडिया आघाडीचे लोकसभेतील उमेदवार आमदार प्रतिभा...

शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. 18 April, 2024

शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील शिंदोला येथील रहिवाशांनी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत एकमताने बहिष्कार टाकला होता.मात्र याच गावातील...

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर 18 April, 2024

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर

वणी:पंतप्रधान नरेंद्र मोदी अब की बार ४०० पारचा नारा देत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व मोदी यांना २००...

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती*    *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर* 17 April, 2024

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर*

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे...

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी. 17 April, 2024

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी.

वणी : भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात...

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी 15 April, 2024

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

झरी : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने बिना डीजे वाजविता वेडद पो.अडेगाव ता.झरी जि.यवतमाळ येथे भीमजयंती...

वणीतील बातम्या