परप्रांतीय कामगारांचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळा - मनसेची मागणी
वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...
Reg No. MH-36-0010493
वणी - शहरातील जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला. पटाच्या तिस-या दिवशी 100 जोड्या धावल्या. यात अ गटात करोडी येथील मनोहर पाटील चव्हाण यांची लखन व जलवा ही जोडी पहिली ठरली. या जोडीने 6.54 सेकंदात अंतर कापत 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. तर क गटात दहिवड येथील कु. भव्या अमोल पवार यांची जलवा व सैराट ही जोडी विजेती ठरली. या जोडीने 6.79 सेकंदात अंतर कापत 41 हजारांचे रोख पारितोषिक पटकावले. बक्षिस वितरण कार्यक्रमाला आ. प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होत्या. अखेरच्या दिवशी 40 हजार पेक्षा अधिक लोकांनी या शर्यतीचा थरार अनुभवला.
अ गटात दुसरे बक्षिस हिवरा येथील साहेबराव पाटील यांच्या लक्ष्या व राणा या जोडीने, तिसरे बक्षिस धारफळ येथील अशोकराव पाटील यांच्या बजरंग व वंशी या जोडीने पटकावले. क गटात दुसरे बक्षिस वडगाव येथील नवनाथ महाराज प्रसन्न यांच्या हिरा व शिवा जोडीने तर घोंगशी कांडा येथील राम चव्हाण यांच्या बलमा व नंद्या या जोडीने तिसरे बक्षिस पटकावले. या दोन्ही गटात पहिल्या येणा-या 13 शेतक-यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस देण्यात आले.
बक्षिस वितरण समारंभात बोलताना आ. प्रतिभा धानोरकर यांनी शंकरपट हा शेतक-यांना आनंद देणारा खेळ असून अनेक वर्षांनंतर हा खेळ सुरु झाल्याने बळीराजाच्या चेह-यावर समाधान दिसून येत असल्याचे मनोगत व्यक्त केले. तर आयोजक संजय खाडे यांनी हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानत यापुढेही कायम अशा स्पर्धा, खेळ भरवण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार या शंकरपटा दरम्यान वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, खेळ, कला, पत्रकारिता, उद्योजक्ता, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रातील कार्यातून समाजासाठी योगदान देणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे सदस्य व संजय खाडे मित्र परिवारातील शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
वणी :परप्रांतामध्ये गंभीर स्वरूपाची गुन्हे करून वणी आणि परिसरातील कंपन्यांमध्ये हे गुन्हेगार कामगार म्हणून कार्यरत...
वणी:वणी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आल्या नंतर संघटनात्मक बांधणी मध्ये मोठा निर्णय घेण्यात...
चंद्रपूर :दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे प्रोएँक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षा घेण्यात...
झरी :परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड केली . ही घटना अत्यंत...
*प्रोऍक्टिव्ह अबॅकस द्वारा आयोजित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत चंद्रपूर मधील मित विनोद वांढरे नागपूर विदर्भातून प्रथम* ✍️...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...