वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
वणी:- धर्म हा देशाचा आधारस्तंभ आहे. जिथे जिथे धर्म व राष्ट्र कार्याचा विषय येतो तेथे युवकांनी संघटित होऊन पुढाकार घ्यावा असे आवाहन केंद्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष ना. हंसराज अहिर यांनी केले. ते मागील वर्षी प्रमाणे महाशिवरात्री निमित्त भव्य त्रिशूल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
येथील टिळक चौकात त्रिशूल रॅलीच्या प्रचार व प्रसारासाठी संपर्क कार्यालायचे उदघाटन ना. हंसराज अहिर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्रिशूल रॅली आयोजन समितीचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, आयोजन समितीचे मार्गदर्शक प्रशांत भालेराव, गजानन कासावार, दिनकरराव पावडे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रस्ताविकातून प्रशांत भालेराव यांनी रॅलीचे महत्व सांगून मागील वर्षी प्रमाणे भव्य त्रिशूल रॅलीचे आयोजन होणार असल्याचे विशद केले. त्यानंतर तारेंद्र बोर्डे यांनी महाशिवरात्री निमित्त दि. 8 मार्च रोजी पूर्ण भक्ती भावाने वणी ते शिरपूर गडा या 14 किलोमीटर अंतरापर्यंत आयोजित त्रिशूल रॅलीचे नियोजन उपस्थितांसमोर मांडले. यात 251 किलो वजनाचा त्रिशूल राहणार आहे. गडावर अभिषेक करण्यासाठी काशी वरून पवित्र गंगा जल आणण्याची व्यवस्था ना. हंसराज अहिर यांनी करून दिली. यात एकशे एक कलश धारी महिला राहणार आहे. सहभागी शिवभक्तांना सारखा पोशाख असावा असा प्रयत्न करण्यात येणार आहे. उपस्थितांचे आभार लवली लाल यांनी मानले. याप्रसंगी असंख्य युवक उपस्थित होते.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...