Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / I.M.A. च्या अध्यक्षपदी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

I.M.A. च्या अध्यक्षपदी डॉ.शिरीष कुमरवार यांची निवड, पदग्रहण सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन व चर्चा सत्र.

I.M.A. च्या अध्यक्षपदी डॉ.शिरीष कुमरवार यांची निवड, पदग्रहण सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन व चर्चा सत्र.
ads images

वणी:- डॉक्टरांची प्रतिष्ठित संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन वणी शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा २ मार्च रोजी वसंत जिनिंगच्या हॉल मध्ये पार पडला. या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन व चर्चा सत्र घेण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर एम्स येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनिष श्रिगीरीवार, अमरावती येथील फॉरेन्सिक तज्ञ डॉक्टर पवन टेकाडे, आय.एम.ए.महाराष्ट्र माजी अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,

जेष्ट पोटविकार तज्ञ डॉ. मनोज व्यवहारे, वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ. श्रिगिरिवार यांनी अवयवदान या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच आय.एम.ए. वणी संघटनेला सर्व प्रकारची मदत  करण्याचे आश्वासन दिले.

दुपारच्या सत्रात  प्रमुख वक्ते डॉ. मनोज व्यवहारे यांनी लिव्हर व पोट विकार यावर  उपचार पद्धती बाबत उपस्थित सर्व डॉक्टरांना माहिती दिली. त्यानंतर पदग्रहण सोहळ्यास सुरुवात झाली.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.शिरीष कुमरवार यांची अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली.त्यानी  माजी अध्यक्ष डॉ.शिरीष ठाकरे यांचे कडून पदभार स्वीकारला.

डॉ.सुनिल जूमनाके यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर डॉ. संकेत अलोने सचिव, डॉ.स्वप्निल गोहोकार सहसचिव, डॉ.विकास हेडाऊ कोषाध्यक्ष, डॉ.संचिता नगराळे यांची महिला विंग सचिव म्हणून निवड झाली.डॉ.प्रतिक कावडे यांची सांस्कृतिक सचिव तर डॉ.अभिषेख गौरकार यांची क्रिडा सचिव म्हणून निवड करण्यात आली.

वणी येथील डॉ.मिलींद तामगाडगे व डॉ.माधुरी तामगाडगे यांची मुलगी आकांशा हिची नुकतीच पोलिस दलात दिल्ली येथील कमिशनर पदावर नियुक्ती झाल्याबद्दल तिचा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा सत्कार करण्यात आला.तो सत्कार तिची आई डॉ. माधुरी तामगाडगे यांनी स्विकारला.

सायंकाळी उपस्थित सर्व डॉक्टरांनी सांस्कृतीक कार्यक्रमात  भाग घेतला. त्यात डॉ.संचिता नगराळे, डॉ.हुड, डॉ.प्रिती लोढा, डॉ.अलोने, डॉ.सुनिल जुमनाके, डॉ.आशुतोष जाधव, वसुधा भोयर, यांनी आपली कला सादर केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संकेत अलोने यांनी केले.तर आभार प्रदर्शन डॉ. प्रतिक कावडे यांनी केले.

कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व सभासद, सह परिवारासह उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी डॉ.महेंन्द्र लोढा, डॉ.गणेश लिमजे यांनी सहकार्य केले.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या