Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / उंबरकर यांच्या पुढाकारातून...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

उंबरकर यांच्या पुढाकारातून साकारणार भव्य शिवमंदिर, भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण.

उंबरकर यांच्या पुढाकारातून साकारणार भव्य शिवमंदिर, भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण.
ads images

वणी/प्रतिनिधी: वणी शहरातील कनकवाडी - देशमुखवाडी येथे महादेव मंदिराचा भूमिपूजन समारंभ मनसेचे राजू उंबरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. मनसे पक्षनेते राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून हे मंदिर साकार होणार आहे. 

वणी शहरातील कनकवाडी - देशमुखवाडी येथे महादेव मंदिर जागृत स्थान असून स्थानिकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. परंतु शंकर भगवानजींचा हा परीसर उघडा असल्याने याठिकाणी भाविकांना उन,वारा व पावसाचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या मंदिराचे बांधकाम करून देण्यासाठी स्थानिक महिला भगिनींनी मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर यांची भेट घेऊन आग्रह करत विनंती केली होती. या विनंतीचा विचार करून महिलांनी व ग्रामस्थांनी केलेली मागणी उंबरकर यांनी मान्य केली व मंदिराच्या बांधकामासाठी स्वखर्चातून निधी उपलब्ध करून दिला.

महादेव मंदिराच्या जागृत देवस्थानचे पवित्र काम करण्याची संधी मला आपण ग्रामस्थांनी दिलीत आणी ते काम मी लवकरात लवकर पूर्ण करेल. या मंदिराचे भूमिपूजन करत असताना मनात भावभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. या मंदिराचे काम लवकरच पूर्णत्वास जाऊन भाविकांना दर्शनासाठी खुले होईल याचा आनंद आणि समाधान आहे - राजु उंबरकर,  मनसे पक्ष नेता.

या मंदिराच्या भूमिपूजनाचा समारंभ उंबरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यामुळे भाविक भक्तांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. याबद्दल महिलांनी व ग्रामस्थांनी मनसे नेते राजू उंबरकर यांचा सन्मान करून आभार मानले. हे मंदिर लवकरच पूर्णत्वास जाऊन भाविक भक्तांना दर्शनासाठी खुले होणार असल्याचे उंबरकर यांनी यावेळी सांगितले. यापुढील काळात देखील आपल्या सर्वांच्या मागणीचा विचार करून आवश्यक ती कामे पूर्ण करण्याचा विश्वास उपस्थित महिला - भगिनींना व स्थानिकांना दिला.

यावेळी शालिनी रासेकर,वंदना दगडी ,मंदा  मांदाळे,तुषार नरपांडे,शालु शिखरे,माला ठेंगणे, चारूलता पानघाटे,अल्का रनदिवे,विद्या कापसे,अश्विनी पारखी, कल्पना घागी, प्रा.महादेव घागी, विजय राजुकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, विलन बोदाडकर, गितेश वैद्य, मयूर घाटोळे, मयुर गेडाम, संस्कार तेलतुंबडे, संदीप ठोंबरे यांच्या सह परिसरातील सर्व महिला व नागरिक उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या