Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *शहरातील संपूर्ण इंग्रजी...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*शहरातील संपूर्ण इंग्रजी शाळांमध्ये वाढविलेली वार्षिक शुल्क कमी करा* *आठ दिवसांत कमी न केल्यास सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करू.मनसेचा इशारा*

*शहरातील संपूर्ण इंग्रजी शाळांमध्ये वाढविलेली वार्षिक शुल्क  कमी करा*    *आठ दिवसांत कमी न केल्यास  सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करू.मनसेचा इशारा*
ads images

*शहरातील संपूर्ण इंग्रजी शाळांमध्ये वाढविलेली वार्षिक शुल्क  कमी करा*

आठ दिवसांत कमी न केल्यास  सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आंदोलन करू.मनसेचा इशारा

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:--वणी शहरासह संपूर्ण तालुक्यात खाजगी शाळांनी शिक्षणाचे बाजारीकरण केले असून याचा फटका सवर्सामान्यांना बसत आहे. सदर शाळा चालक आपला मनमानी कारभार चालवत वाटेल तेवढ्या शुल्क आकारणी करत आहे.यासंदर्भात मनसेचे शहराध्यक्ष शिवराज पेचे यांनी  १८ मार्च रोजी गटशिक्षणाधिकारी पं.स.वणी यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, वणी शहरातील संपूर्ण इंग्रजी शाळा (काॅनव्हेन्ट) हे विद्यार्थ्यां कडून वार्षिक शुल्क २५ ते ३० हजार रुपये वसूल करीत आहे.त्यात वर्षाकाठी १५ ते २० हजार रुपये आहे. तर यामध्ये गणवेशाचे ४ते५ हजार तर  पाठयपुस्तकाचे ३ ते ४ हजार व इतर अन्य काही शुल्क आकारता एका विद्यार्थ्यांकडून वर्षाकाठी २५ ते ३० हजार रुपये वर्षाला पालकांकडून वसूल करण्यात येतात. तर या उलट या दर्जाचे शिक्षण व सुविधा सुद्धा या शाळांमध्ये नाही. या सर्व गोष्टीची आणि वास्तव परिस्थतीची संपूर्ण माहिती आपणास व आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यास माहिती आहे. परंतु आपणास या शाळा चालकाकडून मिळत असलेल्या आर्थिक चिरीमिरी मुळे आपण या कडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात, असे आम्हास वाटते.सदर शाळेत (कॉनवेन्ट ) मध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे सर्व साधारण कुटुंबातून येणारे आहे. त्यामुळे एकाचवेळी एवढी रक्कम देण्यास पालकास शक्य नसल्यास ते पालक हि रक्कम काही टप्प्यात भरतात. तर काहीची सद्यस्थितीत ही रक्कम भरणे शक्य नसल्याने, त्यासाठी त्यांनी काही अवधी शाळा चालकाकंडे मागत आहे. मात्र शाळा चालक आपली मगृरी कायम ठेवत त्यांच्या पाल्यांना शाळेत बसू देत नाही. तर परीक्षेपासून वंचित ठेवत आहे. तर पालकांना अरेरावीच्या भाषेत बोलून दमदाटी करत आहे. त्यांना मानसिक त्रास देत आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. मात्र येथील शाळा चालक आपल्या पैशाच्या कमाईसाठी या कायद्याला पायदळी तुडवत आहे. प्रसंगी शेकडो विद्यार्थी शाळेत न जाता घरी आहेत. याच्या अनेक तक्रारी आमच्या कडे आल्या असून अनेक पालकांनी ही व्यथा मांडली आहे. तरी आपण सर्व प्रकाराची तत्काळ चौकशी करून सर्व शाळा चालकांवर कारवाई करावी व सर्व विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण देण्यास सक्तीचे आदेश द्यावे..हा प्रकार तत्काळ थांबवून या सर्व शाळा चालकावर येत्या ८ दिवसात कारवाई न झाल्यास आपण या सर्व प्रकारास पाठबळ देता असे समजून आपणा विरोधात या सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनातु देण्यात आला.यावेळी शहर अध्यक्ष शिवराज पेचे,शहर उपाध्यक्ष मयुर गेडाम आजिद शेख,रितीक पचारे,अयाज खान, मयुर घाटोळे, सचिन जादव, सारंग चिंचोलकर, अमोल मसेवार, संस्कार तेलतुंबडे, गुड्डू वैद्य ईत्यादी उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या