Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *निराधार आयुष्य जगणा-या...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*निराधार आयुष्य जगणा-या वृद्धाला व्हिलचेअर वाटप* विजय चोरडिया यांच्या प्रयत्नातून मिळाला वृद्धाला आधार

*निराधार आयुष्य जगणा-या वृद्धाला व्हिलचेअर वाटप*  विजय चोरडिया यांच्या प्रयत्नातून मिळाला वृद्धाला आधार
ads images

*निराधार आयुष्य जगणा-या वृद्धाला व्हिलचेअर वाटप*

विजय चोरडिया यांच्या प्रयत्नातून मिळाला वृद्धाला आधार

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

वणी:-पत्नीचा मृत्यू, मुलबाळं नाही, आजारामुळे दोन्ही पाय अधू झाल्याने निराधार अवस्थेत अत्यंत हालाखीचे जीवन जगणा-या मेंढोली येथील एका वृद्धाला विजय चोरडिया यांच्या हस्ते व्हिलचेअर देण्यात आली. जानबा करणू कोवे असे वृद्धांचे नाव आहे. कुणाचाही आधार नसल्याने ते गेल्या काही वर्षांपासून घराबाहेर देखील पडले नव्हते.जानाबा कोवे (65) वर्ष हे तालुक्यातील शिरपूर जवळील मेंढोली येथील रहिवासी आहे. ते शेतात मजुरी करायचे. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्या पायाला आजार झाल्याने त्यांचे दोन्ही पाय अधू झाले. त्यानंतर त्यांची पत्नी ही मजुरी करून घर चालवायची. मुलंबाळं नसल्याने केवळ पत्नीचाच त्यांना आधार होता. मात्र तीन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला.तेव्हापासून त्यांचा जगण्याचा आधारच गेला. त्यातच त्यांचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला. पुढे डोळ्यांना योग्य तो उपचार न मिळाल्याने त्यांच्या दुस-या डोळ्यावरही त्याचा परिणाम झाला. पाय पूर्णपणे निकामी आणि डोळे ही काही प्रमाणात अधू झाल्याने ते घरीच राहायचे. त्यांना उचलण्यासाठीही 3 ते 4 लोकांची मदत लागायची. त्यांची ही परिस्थिती स्माईल फाउंडेशनचे सागर जाधव यांच्या पर्यंत पोहोचली.सागर जाधव यांनी याची माहिती वणीतील समाजसेवक विजय चोरडिया यांच्या पर्यंत पोहोचवली. विजय चोरडिया यांनी जानबा कोवे यांना मदत करण्याचे वचन दिले. बुधवारी दिनांक 20 मार्च रोजी जानबा यांना विजय चोरडिया यांच्या हस्ते व्हिलचेअर देण्यात आली. जानबा यांचा दुसरा डोळा ही अधू आहे. डॉक्टरांनी त्यावर उपचार होणे अशक्य असल्याचे सांगितले. मात्र डोळ्याची शस्त्रक्रिया शक्य असल्यास त्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही विजय चोरडिया यांनी दिली.विजय चोरडिया अध्यक्ष असलेल्या वणी निधी अर्बन लिमिटेड या पतसंस्थेच्या सौजन्याने ही व्हिलचेअर देण्यात आली. यावेळी स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव, आदर्श दाढे, शुभम डोंगे, उमेश पोद्दार, यासह वणी अर्बन निधी लिमिटेडचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या