Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / गतिशील विकास, सर्वसामान्यांचा...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

गतिशील विकास, सर्वसामान्यांचा विश्‍वास हेच ध्येय : सुधीर मुनगंटीवार

गतिशील विकास, सर्वसामान्यांचा विश्‍वास हेच ध्येय : सुधीर मुनगंटीवार
ads images

वणी येथे भाजपच्या बुथ आणि शक्ती केंद्र प्रमुखांशी संवाद, काँग्रेसच्या फसव्या प्रचारापासून मतदारांना सावध करा.

वणी,:-  भाजपाच्‍या तिकीटावर विधानसभेसाठी 16 मार्च 1995 ला जेव्‍हा पहिल्‍यांदा निवडून आलो तेव्‍हाही जनतेची सेवा हेच लक्ष्‍य होते, आज विश्‍वगौरव व राष्‍ट्रभक्‍त देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्‍या आग्रहावरून लोकसभा निवडणुकीमध्‍ये जनतेची सेवा करण्‍यासाठीच उभा आहे तेव्हा गतिशील विकास आणि जनतेचा विश्वास हेच ध्येय आहे. असे प्रतिपादन राज्‍यांचे वने, सांस्‍कृतिक कार्य मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा झाल्‍यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी वणी येथे आयोजित बुथ कार्यकर्ता व शक्ती केंद्र प्रमुख संमेलनाला २१ मार्च रोज मंगळवारी संबोधित केले. उमेदवारी जाहीर झाल्‍यानंतर मुंबई हून चंद्रपूरला परतल्‍यावर कार्यकर्त्‍यांनी केलेल्‍या स्‍वागताने मी भारावून गेलो, असेही  मुनगंटीवार म्‍हणाले. वणी येथील श्री विनायक मंगल कार्यालयात आयोजित या संमेलनाला वणी विधानसभेतील तीन हजार प्रमुख कार्यकर्ते, आघाडी प्रमुख उपस्थित होते. 

कॉंग्रेस पक्षाच्‍या कार्यप्रणालीवर टिका करताना  सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले,  कॉंग्रेस हा पक्ष देशभक्‍तीच्‍या रुपात आलेला ‘ मायावी राक्षस ’ असून सोशल म‍िडीयाच्‍या माध्‍यमातून मतदारांना प्रलोभने दाखवण्‍यासही तो कमी करणार नाही. कॉग्रेसच्‍या काळातच निवडणुकांमध्‍ये ईव्‍हीएम मशीन पहिल्‍यांदा वापरली गेली होती, हे कॉंग्रेस विसरले असल्‍याचे सांगत त्‍यांनी कॉंग्रेसचा उमेदवार कोणीही असला तरी निवडून एन डी एच चा उमेदवार येईल आणि एकदा निवडून आल्‍यानंतर कॉंग्रेसच्‍या वाट्याला हा मतदारसंघ जाऊ देणार नाही, असे ठाम मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. 

निवडणूक जिंकण्‍यासाठी बुथ कार्यकर्त्‍यांचा वाटा महत्‍वाचा असून त्‍यांनी मा.  मोदी यांचे कार्य जनतेपर्यंत पोहाचवावे, त्‍यांच्‍या मनात विश्‍वास निर्माण करावा, शेतकरी व महिला हितासाठी कार्य करावे, असे आवाहन बुथ कार्यकर्त्‍यांना उद्देशून ना. मुनगंटीवार यांनी केले.यावेळी आ. संजीव रेड्डी बोदकुलवार, आ. मदन येरावार, आ. अशोक उईके, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे., चंद्रपूर लोकसभा विस्तारक रवी बेलुरकर,राजेंद्र महाडोळे, राम लाखीया आदी भाजपा नेते मंचावर उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

वणीतील बातम्या