Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / वणी पोलिस स्टेशन येथे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

वणी पोलिस स्टेशन येथे शांतता समीतीची बैठक संपन्न.

वणी पोलिस स्टेशन येथे शांतता समीतीची बैठक संपन्न.
ads images

प्रशासकीय अधिकारी गैरहजर समितीच्या सदस्या मध्ये बैठकीत नाराजी.

वणी:- शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आज ३ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता वणीचे ठाणेदार अनिल बेहराणी यांनी पोलिस स्टेशनच्या आवारात या महिन्यात येणारे सण व लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात शांतता समितीची बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत शांतता समीतीचे सभासद,व्यापारी संघटनेचे सभासद, महिला दक्षता समितीच्या सभासद, पत्रकार आणि उत्सव समितीचे अध्यक्ष व सभासद यांना आमंत्रित केले होते.

एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुक, गुढीपाडवा, रमजान ईद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, रामनवमी, भगवान महावीर जयंती, हनुमान जयंती हे सण साजरे होणार असल्याने वणी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

विशेष या बैठकीत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,बांधकाम विभागाचे अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, महावितरण कंपनीने अधिकारी, हे उपस्थित नसल्याने समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही फक्त पोलिस विभाची आहे का,असा प्रश्न उपस्थित केला होता.

यावेळी नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष,शहरातील बेशिस्त वाहतूक, ऑटो चालकांची मुजोरी, रोडवरील अतिक्रमण, मध्यवस्तीमधून अवैध रेती वाहतूक, याबाबत ठाणेदार यांना सुचना दिल्या.

ठाणेदार अनिल बेहराणी यांनी सांगितले की, माझ्या परीने मी वणी शहराची शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करेल तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी मित्र पोलिस देऊ, तसेच गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.अशी ग्वाही दिली.

यावेळी सण उत्सव समितीचे सदस्य, शांतता समितीचे सदस्य, महिला, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणीतील बातम्या