Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / महामानव डॉ.बाबासाहेब...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी.

वणी : भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  133 वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. दरम्यान शहरासह गावागावात शोभायात्रा, मिरवणूक काढून आंबेडकरी बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला तसेच भीम गीताच्या तालावर आंबेडकरी बांधव चांगलेच थिरकले त्यामुळे आज वणी शहर भीमगर्जनेने सकाळपासून गजबजले होते .विशेष म्हणजे, जयंती उत्सव मागील दोन दिवसापासून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त स्थानिक आंबेडकर चौकातील पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता शहरातील विविध भागातून आंबेडकरी बांधव मिरवणुकीसह दाखल झाले सायंकाळी आठ वाजता पासून रात्री बारा वाजेपर्यंत अनेक चौकासह टिळक चौक ,टागाैर चौक ,खाती चौक ,गांधी चौक, कमान चौक ,मुख्य मार्गाने मिरवणूक निघाली.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती आज वणीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून अनेक सार्वजनिक उत्सव समिती तसेच आंबेडकरी बांधव कामाला लागले होते. कार्यक्रमासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात आले होते मागील दोन दिवसापासून महोत्सवाला सुरुवात झाली असून काल रात्रीपासून सांगितल्याप्रमाणे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, मध्यरात्रीला बारा वाजता पुतळ्या समोर आंबेडकर बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव फटाक्याच्या आतीष बाजीने तसेच केक कापून साजरा केला.

आज सकाळपासूनच शहरात हातात निळे झेंडे ,पांढरे शुभ्र पोशाख ,गळ्यात निळा रंगाचा दुपट्टा परिधान करून आंबेडकरी बांधव दिसून आले. सकाळी सात वाजता पासून वणी शहरात जयंती कार्यक्रमाला सुरुवात झाली. जयंतीनिमित्त आंबेडकरी बांधवांनी मोठ्या मिरवणूक काढली ,ढोल ताशे ,डीजेच्या तालावर महामानवाला आदराजंली वाहीली भीम गीतां च्या निनादात लहानापासून ज्येष्ठापर्यंत आंबेडकरी बांधव मग्न दिसून आले .जयंतीनिमित्त बुद्ध विहारात सर्वप्रथम बुद्ध  वंदना करण्यात आली त्याचप्रमाणे शहरातील डॉ.आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला   माल्यारपण   करीत आंबेडकरी बांधवांनी आदरांजली वाहीली. विशेष म्हणजे ,लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू आहे. कुठेही आचारसंहिता भंग होऊ नये याबाबतची दक्षता घेत डॉ. आंबेडकर जयंती शांतते साजरी करण्यात आली 

दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव कार्यक्रम स्थानिक  आयोजित करण्यात आला होता दरम्यान वणी शहरातील कानाकोपऱ्यातून निघालेल्या शोभायात्रा मिरवणूक ढोल ताशे ,डीजे धुमाल आणि जय भीम जय घोषात हजारोच्या संख्येने आंबेडकरी बांधव पोहोचले जयंती निमित्त आंबेडकर चौकात विशेष रोषणाई सजावट करण्यात आली होती.

ads images

ताज्या बातम्या

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड 02 May, 2024

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

विजया शेवाळकर यांचे निधन. 02 May, 2024

विजया शेवाळकर यांचे निधन.

वणी: प्राचार्य शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक २ मे रोजी सकाळी सात वाजता दरम्यान...

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस. 01 May, 2024

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस.

वणी:- महाराष्ट्र वाद्यातर्फे १ मे महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे १ मे रोजी...

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त. 01 May, 2024

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त.

: पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांची गोवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई पोस्टे गडचांदूर परिसरात १५० जनावरांसह १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त. 01 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांची गोवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई पोस्टे गडचांदूर परिसरात १५० जनावरांसह १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे* 30 April, 2024

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष...

वणीतील बातम्या

विजया शेवाळकर यांचे निधन.

वणी: प्राचार्य शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक २ मे रोजी सकाळी सात वाजता दरम्यान...

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस.

वणी:- महाराष्ट्र वाद्यातर्फे १ मे महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे १ मे रोजी...

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त.

: पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...