Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *बाबासाहेबांच्या राज्य...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर*

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती*    *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर*
ads images
ads images

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती*

 

*मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर*

 

✍️ राजू गोरे शिरपूर

 

वणी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर जयंती निमित्त मेंढोली या गावात उत्साहात कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी गावकऱ्यांनीं 11 वाजता बाबासाहेबांचा जयजयकार करीत रॅली काढली. त्यानंतर सभा घेण्यात आली.भीमजयंती निमित्त मेंढोली येथे झालेल्या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुमार मोहरमपुरी व ऍड. दिलीप परचाके होते तर अध्यक्षस्थानी नारायण गोडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे सरपंच विनायकराव ढवस, नगराळे साहेब, मनोज काळे, हेमंत एकरे, नंदकिशोर बोबडे हे उपस्थित होते.भारतीय संविधान तयार करण्याचे काम घटना समितीला सोपविण्याचे निश्चित झाल्यानंतर  अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडारेशनाच्या  वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासंदर्भात एक प्रस्ताव/निवेदन सादर केले होते ह्या निवेदनात मूलभूत हक्क, अल्पसंख्यांकचे अधिकार, अस्पृश्यांच्या संरक्षनविषयी तरतुदी ह्या नमूद होत्या. अनुच्छेद दोन, भाग दोन, खंड चार मध्ये आर्थिक शोषणा विरुद्ध संरक्षण मध्ये राज्य समाजवादाची मांडणी केली व संविधानामध्ये ती संविधानाचा मुळ पाया असली पाहिजे व त्याला येणाऱ्या कोणत्याही शासकाला त्यामध्ये फेरबादल करण्याचा अधिकार नसेल ज्यामुळे कोणत्याही शेतकरी व कामगाराचे कधीही शोषण होणार नाही. परंतु प्रत्यक्षात संविधान लिहीत असताना संविधान सभेने त्यांची ही मांडणी स्वीकारली नसल्याने  बाबासाहेबांनी  संविधान अर्पण करताना इशारा दिला कि, राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्या न दिल्याने पुढील काळात पीडित जनता मोठ्या श्रमाने निर्माण केलेली संसदीय लोकशाही उधळून लावतील. आज बाबासाहेबांचा राज्य समाजवाद अस्तित्वात न आल्याने आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली असून भूखमरीत देशाचा क्रमांक 142 व्या स्थानी आहे. सुशिक्षित बेरोजगारांची टक्केवारी 83% आहे. देशाची व्यवस्था बरबादीचा उंबरठ्यावर असून ह्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. गेल्या 10 वर्षात परिस्थिती अधिक बिकट झाल्याचे चित्र समोर दिसते आहे. बाबासाहेबांची जयंती साजरी करीत असताना बाबासाहेबांचा ईशार्याकडे लक्ष देऊन पुढील वाटचाल करावी लागेल, असे या कार्यक्रमात कुमार मोहरमपुरी व ऍड. दिलीप परचाके यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना सुर काढला.भीमजयंती निमित्ताने झालेल्या सभेचे संचालन सुधाकर तुराणकर यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजक जयप्रकाश तेलंग, एकनाथ नालमवार, बुद्धिजम तेलंग, ऋषीं कुळमेथे, संजय वालकोंडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला गावातील अनेक स्त्री पुरुष उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

वणीतील बातम्या

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...