Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / लोकशाही पद्धतीने निवडून...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर
ads images
ads images

भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकणार नाही, माजी खासदार कुमार केतकर यांचे परखड मत इलेक्टोरल बाँड हा जगातील सर्वांत मोठा घोटाळा असून उघड उघड दादागिरीने खंडणी गोळा करण्याचा कायदेशीर मार्ग असल्याची टीका केतकर यांनी केली.

वणी:पंतप्रधान नरेंद्र मोदी अब की बार ४०० पारचा नारा देत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व मोदी यांना २०० पेक्षा अधिक जागा जिंकता येणार नाही. त्यामुळे मोदी यांना पंतप्रधान देखील होता येणार नाही, असे मत काँग्रेसचे राज्यसभेचे माजी खासदार तथा ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केले. इलेक्टोरल बाँड हा जगातील सर्वांत मोठा घोटाळा असून उघड उघड दादागिरीने खंडणी गोळा करण्याचा कायदेशीर मार्ग असल्याची टीकाही केली.

मुक्तसंवादच्या वतीने हॉटेल एनडी येथे आयोजित हुकुमशाही विरुद्ध लोकशाही या कार्यक्रमासाठी केतकर येथे आले होते. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना कुमार केतकर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. लोकशाही पद्धतीने निवडून येवून हुकूमशाही लादण्याची नवीन पद्ध जगात सुरू झालेली आहे. ही केवळ भारतात सुरू झालेली आहे असे नाही तर हंगेरी, टर्की येथे हा प्रकार आहे. भारतात त्याचा आविष्कार सर्वात प्रगत व उग्र आहे. भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारताची १४० कोटी लोकसंख्या आहे व ९७ कोटी मतदार आहे. या मतदारांना विशिष्ट प्रकारे जुंपायचे आणि त्यांच्यावर आपली मते, भूमिका आपली धोरणे लादायची असा हा प्रकार आहे. याचेच नाव हुकूमशाही आहे. नरेंद्र मोदी यांचा स्वपक्षीय खासदारांसोबत संवाद नाही. कॅबिनेटसोबत देखील चर्चा करित नाहीत. पीएमओच्या माध्यमातून आणि थोडाफार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या माध्यमातून त्यांचा कारभार सुरू आहे. यालाच हुकूमशाही असे म्हणतात. अलिकडच्या काळात याला निवडणुकीतून आलेली हुकूमशाही असे म्हणतात. मोदी यांचा प्रयत्न लोकशाही पद्धतीने निवडून येवून हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मोदी कोणत्याही प्रकारच्या मर्यादा न पाळता भ्रष्टाचाराचे सर्वांधिक आरोप असलेल्या अजित पवार, एकनाथ शिंदे, नारायण राणे यांना शुद्ध करून घेत भाजपात प्रवेश दिला. सत्ता सोडायची नसल्यामुळेच ही अशा पद्धतीने माणसे गोळा करित आहेत, असेही केतकर म्हणाले.

भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकणार नाही, माजी खासदार कुमार केतकर यांचे परखड मत व्यक्त केले.इलेक्टोरल बाँड हा जगातील सर्वांत मोठा घोटाळा असून उघड उघड दादागिरीने खंडणी गोळा करण्याचा कायदेशीर मार्ग असल्याची टीका केतकर यांनी केली.

नोटबंदी हा देखील काळा पैसा पांढरा करण्याचाच एक प्रकार होता असेही ते म्हणाले. वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न केला गेला. मात्र त्यांना आघाडीसोबत यायचेच नव्हते. त्यामुळेच त्यांनी सुरुवातीला राज्यात ४८ जागा लढविणार, त्यानंतर २७ जागा लढविणार असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात त्यांनी काहीच ठिकाणी जागा लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आंबेडकर यांनी उमेदवार उभे केले असले तरी वंचितचा परिणाम होणार नाही असेही केतकर म्हणाले. या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा स्तर अतिशय खालच्या पातळीवर गेल्याबद्दल एक पत्रकार म्हणून चिंता व्यक्त केली.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

वणीतील बातम्या

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...