Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / आज मुनगंटीवार विरुद्ध...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

आज मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमबंद होणार

आज मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमबंद होणार

चंद्रपूर-आर्णी लोकसभेसाठी आज मतदान,18 लाख 37 हजार 906 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदारांनी मतदान करण्याचे भारतीय वार्ता न्यूज चे आवाहन

यवतमाळ : चंद्रपूर-वणी - आर्णी लोकसभा मतदार संघात शुक्रवार, 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. महायुतीकडुन सुधीर मुनगंटीवार तर महाविकास आघाडीकडून प्रतिभा धानोरकर यांच्यात खरी लढत होणार आहे. व इतर उमेदवारांची भाग्य ईव्हीएमबंद होणार असून ४ जुन रोजी उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. 9 हजार 811 अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पोलिस विभाग निवडणुकीसाठी सज्ज आहे. गुरूवारी पोलिंग पार्टी आपल्या निर्धारित मतदान केंद्रावर रवाना झाली. 18 लाख 37 हजार 906 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

महायुती आघाडीचे भाजपाचे मुनगंटीवार, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, वंचित बहुजन राजेश बेले, बसपाचे राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके यांच्यासह निवडणुकीच्या रिंगणातील 15

उमेदवारांचे भाग्य मशीनबंद होणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोडा, वणी, आर्णी या सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण 2 हजार 118 मतदान

केंद्रे आहेत. तर 18 लाख 37 हजार 906 सर्वसाधारण मतदार आहेत. त्यात पुरूष 9 लाख 45 हजार 736, तर 8 लाख 92 हजार 122 महिला मतदारांचा समावेश आहे. 24 हजार 120 युवा मतदार आहेत.

प्रशासन सज्ज

सर्व मतदान केंद्रावर तप्त उन्हापासून संरक्षणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदाराकरिता त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने 'व्हीलचेअर'ची व्यवस्था करण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 196 विशेष मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. 6 आदर्श मतदान केंद्र, तर 6 आदर्श मतदान केंद्रे आहेत. 11 हजार 242 ओआरएस पाकिटे मतदान कर्मचा-यांना वितरित करण्यात आली आहेत.

सहाही मतदारसंघात बीयू सयंत्र, सीयू सयंत्र, आणि व्हीव्हीपॅड वितरित करण्यात आले आहेत. मतदान केंद्राध्यक्ष 2 हजार 453, प्रथमत मतदान केंद्र अधिकारी 2 हजार 453, इतर मतदान अधिकारी 4 हजार

905 असे एकूण 9 हजार 811 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय निवडणुक कामकाजाच्या अनुषंगाने 109 जीप, 199 बस, 79 मिनी बस अशी एकूण 379 वाहने आरक्षित केली आहेत.

ads images

ताज्या बातम्या

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस. 01 May, 2024

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस.

वणी:- महाराष्ट्र वाद्यातर्फे १ मे महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे १ मे रोजी...

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त. 01 May, 2024

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त.

: पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांची गोवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई पोस्टे गडचांदूर परिसरात १५० जनावरांसह १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त. 01 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांची गोवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई पोस्टे गडचांदूर परिसरात १५० जनावरांसह १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे* 30 April, 2024

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष...

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा* 30 April, 2024

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा*

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

चौकिदाराचा खुन पळसोनी फाट्या जवळील घटना, चोरी करून केला खुन. 29 April, 2024

चौकिदाराचा खुन पळसोनी फाट्या जवळील घटना, चोरी करून केला खुन.

वणी:- वणी शहरा लगत वणी मारेगाव रोड वरील असलेल्या पळसोनी फाट्या जवळ गोडाऊन मध्ये चौकिदाराचा खुन झाल्याची घटना आज सोमवारी...

वणीतील बातम्या

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस.

वणी:- महाराष्ट्र वाद्यातर्फे १ मे महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे १ मे रोजी...

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त.

: पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांची गोवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई पोस्टे गडचांदूर परिसरात १५० जनावरांसह १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...