Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / *नृत्याद्वारे गीत रामायणाचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

*नृत्याद्वारे गीत रामायणाचे उत्कृष्ठ सादरीकरण*

*नृत्याद्वारे गीत रामायणाचे उत्कृष्ठ सादरीकरण*

*नृत्याद्वारे गीत रामायणाचे उत्कृष्ठ सादरीकरण*

 

✍️रमेश तांबे

वणी तालुका प्रतिनिधी

 

वणी:- संस्कार भारती समिती वणी व जैताई देवस्थान यांच्या वतीने पारसमल चोरडिया फौंडेशन वणी यांच्या सौजन्याने जैताई मंदिराच्या रंगमंचावर रामनवमीच्या पूर्वसंध्येला नृत्याद्वारे गीत रामायणाचा उत्कृष्ठ कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात राम अष्टकम या शास्त्रीय नृत्याने झाली. त्यानंतर गीत रामायणातील स्वयें श्री राम प्रभू ऐकती या गीतावरील नृत्याने गीत रामायणावरील नृत्याला सुरुवात झाली. यात गितरामायनातील 14 गीतांवर कार्यक्रम सादर करण्यात आला होता.  त्यानंतर राम जन्मला ग सखे, स्वयंवर झाले सीतेचे, कोण तू कुठला राजकुमार, मज आणून द्या तो हरीण, त्रिवार जयजयकार इत्यादी गीतावर प्रियंका कोटनाके,  सागर मुने, निखिल वाघाडे, अपूर्वा तिमांडे, बाल कलावंत लोकित कोरडे, अशोक सोनटक्के, रिद्धी राऊत, हितेश गोडे, पूजा ठाकूर,  जयती सुराणा, वैष्णवी लिंगमे, सुनिता डाबरे, आरोही  खैरे,  सिमा  सोनटक्के, अन्वी पावडे, स्पृहा कोरडे, कांचन गुरनुले, मीना वानखेडे, वृषाली मुंजेकर,  प्रिया कोणप्रतीवार, दृष्टी कोणप्रतीवार,  जयश्री मेहता, सानवी मुंजेकर, गौरव नायनवार,  प्रविण सातपुते यांनी नृत्य व नाट्याचे सादरीकरण केले.या अतिशय सुंदर आकर्षक कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन अमेझॉन मध्ये टीम लीडर असलेल्या प्रियंका कोटनाके  यांनी केले.या प्रसंगी जैताई देवस्थान समितीचे अध्यक्ष माधव सरपटवार, येथील ठाणेदार अनिल बेहरानी, पारसमल चोरडिया फौंडेशनचे कुणाल चोरडिया, मुन्नालाल तुगणायत, तिरुमल्ला तिरुपती क्रेडिट को. ऑफ. सोसायटीचे राकेश खामनकर प्रामुख्याने उपस्थित होते.सागर झेप बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सागर मुने यांनी पुढाकार घेऊन हा गीत रामायण वर नृत्य व नाट्य कार्यक्रम सादर करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विजय चोरडिया व हरणे कॅटरर्स चे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या अलोणे यांनी केले.

ads images

ताज्या बातम्या

विजया शेवाळकर यांचे निधन. 02 May, 2024

विजया शेवाळकर यांचे निधन.

वणी: प्राचार्य शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक २ मे रोजी सकाळी सात वाजता दरम्यान...

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस. 01 May, 2024

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस.

वणी:- महाराष्ट्र वाद्यातर्फे १ मे महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे १ मे रोजी...

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त. 01 May, 2024

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त.

: पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांची गोवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई पोस्टे गडचांदूर परिसरात १५० जनावरांसह १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त. 01 May, 2024

स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांची गोवंश तस्करांविरुद्ध ऐतिहासीक कारवाई पोस्टे गडचांदूर परिसरात १५० जनावरांसह १ कोटी ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त.

पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे* 30 April, 2024

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष...

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा* 30 April, 2024

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा*

*प्रधानमंत्री मोफत धान्य व्यवस्था कोलमडली शिधा धारकाना डिसेंबर पासून अपूर्ण धान्य वाटप घोटाळा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

वणीतील बातम्या

विजया शेवाळकर यांचे निधन.

वणी: प्राचार्य शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक २ मे रोजी सकाळी सात वाजता दरम्यान...

विदर्भवाद्यांनी वणी येथे पाळला १ मे काळा दिवस.

वणी:- महाराष्ट्र वाद्यातर्फे १ मे महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे १ मे रोजी...

चंद्रपुर जिल्हयातील सुगंधीत तंबाकु तस्कर हनुमान आंबटकर याचे घरून मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाकु जप्त.

: पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन सा., चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे...