Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / स्थानिक गुन्हे शाखा,...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोवंश तस्करांविरूध्द धडक कारवाई पोस्टे मुल परीसरात 37 जनावरांसह 16 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची गोवंश तस्करांविरूध्द धडक कारवाई पोस्टे मुल परीसरात 37 जनावरांसह 16 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त.
ads images

घुग्घुस- : पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंदपुर यांना दिले. त्या अनुषंगाने पो. नि. महेश कोंडावार स्थागुशा चंद्रपुर यांनी पथक नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दिनांक 03/05/2024 रोजी रात्रो पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि, मुल मार्गे एक अवैधरीत्या कत्तलीकरीता जनावरे कोंबुन भरलेला ट्रक CG2457667 हा चंद्रपुर कडे येणार आहे अशा खबरेवरून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पथकाने पोलीस स्टेशन मुल हद्दीत रेल्वे गेट जवळ नाकेबंदी केली असता एक ट्रक रेल्वे गेट कडे येतांना दिसला त्यास थांबविण्यास सांगितले असता ट्रक रोडच्या बाजुला थांबला तितक्यात ट्रकमधील दोन ईसम अंधाराचा फायदा घेउन जंगलाकडे पळून गेले. त्यांचा शोध घेतला असता मिळून आले नाही. ट्रक ड्रायव्हरला खाली उतसवुन त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने आपले नाव नईमउद्दीन करीमउद्दीन शेख वय 39 वर्षे रा.शांतीनगर, घुग्घुस ता.जि. चंद्रपुर असे सांगितले. व पळून गेलेले ईसम हे 1) असलम शेख 2) इर्शादउल्ला खान दोन्ही राह मुर्तिजापुर जि. अकोला असे सांगितले. तसेच सदर जनावरे कुरखेडा घाट जि. गडचिरोली येथुन आणले असुन सादिक खान रा. गडचांदुर याने आणण्यास सांगितले. सदर ट्रकची पंचासमक्ष झडती घेतली असता ट्रकमध्ये गोवंश जातीचे गाय, बैल, गुरे जातीचे जनावरे निर्दयतेने पाय बांधुन कोंबुन असल्याचे दिसले तसेच त्यामध्ये काही जनावरे मृत असल्याचे दिसले. महाराष्ट्रात जनावरे कत्तल करणे, कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतुक करणेस प्रतिबंध असतांना सुध्दा सदर जनावरे कत्तलीसाठी ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त भरून कुरतेने निर्दयतेने अवैधरीत्या वाहतुक करीत तेलंगणा राज्यात नेत असल्याचे समजले. सदर ट्रकमध्ये एकुण 37 गोवंश जनावरे त्यामध्ये 4 मृत जनावरे व वाहन किंमत एकुण 16.50,000/-रु (सोळा लाख पन्नास हजार) चा माल जप्त करण्यात आला असुन एका आरोपीस घटनास्थावरून ताब्यात घेउन आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन मुल यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच वाहनामधील 33 जिवंत गोंवंश जनावरे यांची देखरेख करण्याकरीता प्यार फाउंडेशन दाताळा रोड, चंद्रपुर येथे जमा करण्यात आले. व 4 मृत गोवंश जनावरांचा पंचासमक्ष पशुवैद्यकिय अधिकारी सा. चंद्रपुर यांचे कडुन पोस्टमार्टम करून घेण्याचे सुचनापत्र देण्यात आले.

सदर कर्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनी. हर्षल एकरे , पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि. नितीन रायपुरे, चापोहवा दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.

ads images

ताज्या बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

वणीतील बातम्या

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...