Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / राजूर येथील डॉ.बाबासाहेब...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता.

राजूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत मूलभूत सोयी सुविधांची कमतरता.
ads images

ग्रामपंचायतीने सोयी सुविधा पुरविण्याची मागणी.

वणी :- येथून ७ किमी अंतरावर  तालुक्यातील सर्वात मोठे असलेले व चुना, चुना दगड व कोळसा उत्पादन करणाऱ्या राजूर कॉलरी या गावात मात्र विद्यार्थी व युवकांसाठी चांगले वाचनालय आणि खेळाचे मैदान नाही. विद्यार्थी व युवकांना चांगले भविष्य घडविण्यासाठी स्वबळावर तयारी करून पुढे जावे लागत आहे. ज्या गावातून मोठ्या प्रमाणावर महसूल गोळा होतो व शासनाचा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिजोरीत पैसा जमा होतो तिथे  देशाचे भविष्य विद्यार्थी, युवकांना मात्र मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात दुर्लक्ष केल्या जात आहे. तर लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळा करीत आहेत.

राजूर येथे १४ व्या वित्त आयोगाकडून येथील ग्रामपंचायतीने वरील मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका सुरू केली. या अभ्यासिकेत एक कपाट व त्यात काही पुस्तके उपलब्ध करून दिली. हळूहळू या अभ्यासिकेत विद्यार्थी अभ्यास करायला यायला लागली.परंतु त्या ठिकाणी खुर्चा, बेंच व पंखे आणि आवश्यक पुस्तके उपलब्ध नव्हती. विद्यार्थ्यांनी मागण्या केल्यानंतर तिथे काही खुर्च्या, दोन पंखे व बेंच म्हणून  भिंती लगत पातळ प्लायवूड चे काऊंटर तयार करून देण्यात आले.

सध्याचे घडीला या अभ्यासिकेत एमपीएससी, यूपीएससी, रेल्वे, बँकिंग, एससीसी, पोलीस व अन्य परीक्षे साठी विद्यार्थी अभ्यासासाठी सकाळी ४ वाजे पासून इथे येतात. परंतु ह्या ठिकाणी योग्य व पुरेश्या खुर्च्या नाहीत, पातळ प्लायवूड चे काऊंटर तुटलेले आहेत, पंखे कमी आहेत, उन्हाळ्यात कुलर नसल्याने प्रचंड गर्मी मध्ये अभ्यास करावा लागतो, विद्यार्थिनी साठी मुत्रिघर नाही तसेच मुबलक पाणी नाही, पिण्यासाठी थंड पाणी नाही, चालू घडामोडी साठी मराठी, हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके उपलब्ध नाहीत, स्पर्धा परीक्षेसाठी सामान्य ज्ञान व रिजनींग साठी पुस्तके नाहीत, अश्या परिस्थितीत विद्यार्थी स्वतः आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार पुस्तकांची व्यवस्था करून या ठिकाणी अभ्यास करीत आहेत.

विद्यार्थी व युवक हा देशाचा कणा असतो व तो देशाचे भविष्य घडवीत असतो. सध्या आपला देश सर्वात जास्त तरुण असलेल्यांचा देश आहे. परंतु ह्या तरुणांच्या देशात त्यांच्या भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन देऊन त्यांचा शिक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी कडे वेळ नाही, त्यामुळे प्रशासकीय अधिकारी कृती करायला तयार नाहीत. शासनाने नोकर भरती बंद करून ठेवल्याने सध्या नोकरीच्या जाहिराती नाहीत. असे असतानाही विद्यार्थी पुढील भविष्याचे स्वप्न बघत मोजक्या व अपुऱ्या साधनात अभ्यास करीत तयारी करीत आहेत.

अश्या ह्या बिकट अवस्थेत किमान राजूर येथील सरपंच व ग्रामसेवकाने येथील अभ्यासिकेत मूलभूत गरजांची पूर्तता करून देशाचा भविष्यात हातभार लावावा अशी अपेक्षा राजूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी कडून करण्यात येत आहे.

ads images

ताज्या बातम्या

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

वणीतील बातम्या

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...