Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / येत्या हंगामात कर्ज...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

येत्या हंगामात कर्ज वाटप धोरणात दुरुस्ती करा, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
ads images

वणी:- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हक्काची बॅंक असून या बॅंकेचा कर्जपुरवठा गावा गावात सहकारी सोसायटी, संस्था यांच्या माध्यमातून संस्था सभासदांना शेतीचे कर्ज वाटप करण्यात येते.

आर्थिक वर्ष संपल्यानंतर १ एप्रिल नंतर खरीप हंगामात कर्ज वाटपाला सुरुवात होते.परंतु एक महिना लोटुनही बॅंकेचे कर्ज वाटप धोरण उशीरा २२-४-२०२४ ला जाहीर केल्याने उशीर झाला आहे. १५ एप्रिल २०२४ पासुन कर्ज वाटप करावे असे धोरण असुन अजुनही शेतकऱ्यांना कर्ज वाटपास सुरुवात झाली नाही.

कर्ज वाटप धोरणात सहकारी सोसायट्यांनी लावलेल्या या अटी शर्ती अतिशय चुकीच्या असल्याने सहकारी संस्था,कर्जदार शेतकऱ्यांमध्ये तिव्र संताप पसरला आहे. त्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की,सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व संचालक मंडळांच्या विनंती व पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्च पुर्वी व नंतर  कर्ज परतफेड केलेली आहे. तसेच थकीत कास्तकारांनी एकमुस्त भरणा योजना लाभ घेतला अशा कर्जधारकांना मागील वर्षी ही नविन कर्जाचा  लाभ देण्यात आला. परंतु नवीन धोरणात यांचा समावेश केला नाही.

बॅंक धोरणात खालील बदल करावे, कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक प्राधान्य क्रम अट न लावताच सरसकट कर्ज वाटप करावे, ३१ मार्च व नंतर कर्ज भरणाऱ्या सर्व सभासदांना सरसकट कर्ज वाटप करावे,शेती कर्जा व्यतिरिक्त संलग्न कर्ज दुचाकी ईत्यादी कर्ज थकीत असल्यास कर्ज वाटप न  करणे ही अट रद्द करावी, सामाईक क्षेत्र भुधारकांना २०० रुपये स्टॅंपची अट शिथिल करून इकरा वर व स्वयघोषणा पत्र घेऊन वाटप करण्यात यावे, कर्ज मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे वाढीव क्षेत्र विचारात घेऊन कर्ज वाटप करावे.

शासनाने सहकाराच्या माध्यमातून जिल्हा सहकारी बँक व सहकारी संस्था निर्माण करून सुलभ कर्ज मिळावे हे धोरण असतांना बॅंकेच्या नवीन अटी शर्ती परिपत्रका मुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

१० दिवसाचे आत समस्यांचे निराकरण न झाल्यास शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठा या न्याय मागण्यासाठी सहकारी सोसायटी कर्ज धारक सभासदांना सोबत घेऊन बॅंकेच्या  अन्यायी धोरणा विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातु देण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पिदुरकर यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

ads images

ताज्या बातम्या

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

वणीतील बातम्या

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...