*पतंजली योग शिबिरात वणीकरांचा प्रचंड प्रतिसाद*
✍️रमेश तांबे
वणी तालुका प्रतिनिधी
वणी:-शहरात महिला पतंजली योग समिती,व श्री छत्रपती शिवाजी महाराज मॉर्निंग गृप वणी यांचे संयुक्त विद्यमाने ११,१२,व १३ मे रोजी भव्य निःशुल्क योग शिबिर घेण्यात आले.
या योग शिबिराला संजिवनी माने प्रभारी महाराष्ट्र राज्य पतंजली योग पिठ हरिद्वार व माया चव्हाण विदर्भ प्रदेश पतंजली योग पिठ हरिद्वार यांनी योग शिबिराला मार्गदर्शन केले.
सदर शिबिराच्या आयोजना करिता विजय चोरडिया समाज सेवक वणी यांनी मोलाचे सहकार्य केले.तसेच सुरेश आवारी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्य्यान निःशुल्क उपलब्ध करून दिले.
आयोजकांनी शिबिरार्थी करीता
पोष्टीक अल्पोपहार सुध्दा उपलब्ध करून दिला.
तसेच १३ मे रोजी विठ्ठल मंदिर महिला योग समितीच्या वतीने योग नृत्य सादरीकरण करण्यात आले.
समारोपाच्या कार्यक्रमात संबंधित अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
योग शिबिरामध्ये दररोज सकाळी सुर्यनमस्कार, जॉगिंग,उभ्यास्तितील पाठीवरचे आसन,प्राणायम,यांची संपुर्ण माहिती देण्यात आली. व सर्व शिबिरार्थि कडून वरील सर्व क्रिया करवून घेण्यात आल्या.
या तिन दिवसीय योग शिबिराला बहुसंख्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येणाऱ्या ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने योगदिवसाची पुर्व तयारी म्हणून सुध्दा याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
शिबिर यशस्वीतेसाठी संजय आसकर, बोबडे सर, तारेन्द्र बोर्डे, जयंत सोनटक्के, सुभाष बिलोरीया, किरण दिकुंडवार, कैलास लांजेवार, सुनील बोर्डे, नितीन आवारी, अरुण ढवरे व सर्व सभासदांनी अथक परिश्रमा घेतले.