Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / उद्या बोरी गदाजी येथे...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

उद्या बोरी गदाजी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

उद्या बोरी गदाजी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त समाज प्रबोधनाच्या  कार्यक्रमाचे आयोजन
ads images
ads images
ads images

राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य श्री विकास चिडे सर यांचे जाहीर व्याख्यान

मारेगाव: तालुक्यातील बोरी गदाजी येथे दिनांक 31 मे 2024 रोज शुक्रवार ला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंती महोत्सवाचे सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजन करण्यात आले आहे.राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वैभवशाली तसेच गौरवशाली इतिहास समाजाला माहीत व्हावा या दृष्टिकोनातून समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे सायंकाळी 7.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य श्री विकास चिडे सर यांचे जाहीर व्याख्यान यावेळी आयोजित केले आहे.

Advertisement

या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा. संजय देरकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री विकास चिडे सर (राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सप्तखंजेरिवादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य) उपस्थित राहणार आहे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा प्रा.संजय लव्हाळे सर उपस्थित राहतील.प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन तुराळे सर, श्री काशिनाथ पचकटे सर, प्रवीण नांने सरपंच ग्रामपंचायत बोरी, श्री प्रदीप साबरे उपसरपंच, श्री हुसेन करडे, रामचंद्र करडे , अतुल बोबडे, मंगलाबाई करडे, गंगाताई करडे इत्यादीसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहे.

तेव्हा या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या आणि समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमाला जनतेनी जास्तीत जास्त संख्येने सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच व राजमाता अहिल्यादेवी होळकर महिला विचार मंच, बोरी गदाजी यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे  भूमिपूजन संपन्न*    *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने* 12 September, 2024

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या मार्गाने*

*उपबाजार आवार चंदनखेडा येथे प्लॅटफॉर्म व लिलाव शेडचे भूमिपूजन संपन्न* *कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती विकासाच्या...

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* 12 September, 2024

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा*

*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* 12 September, 2024

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा*

*धोपटाळा फाटा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंतचा रस्ता सुस्थितीत करा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-कोरपना...

विद्युत पोल तात्काळ सरळ करण्याची शिवसेना (उ.बा.ठा.) चे उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांची मागणी. 12 September, 2024

विद्युत पोल तात्काळ सरळ करण्याची शिवसेना (उ.बा.ठा.) चे उपतालुकाप्रमुख मनोज ढेंगळे यांची मागणी.

वणी:- वणी ते नांदेपेरा रस्त्यावरील स्वर्णलीला शाळेसमोरील धोकादायक विद्युत वाहिनी पोल तात्काळ सरळ करून लोंबकळलेल्या...

नगर परिषद  शाळा क्र ८ वणी मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प 11 September, 2024

नगर परिषद शाळा क्र ८ वणी मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पर्यावरण पूरक श्री गणरायाचे हस्तशिल्प

वणी:- संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ७ सप्टेंबर पासून घरोघरी तसेच गावागावात श्री गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात...

वणी आगाराला नविन बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. 11 September, 2024

वणी आगाराला नविन बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

वणी : यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्वपूर्ण शहर असून, वणी शहर हे वेकोलीच्या खदानी मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात...

मारेगावतील बातम्या

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे आयोजन*

*मारेगाव तालुक्यातील विविध गावात बैलपोळा सजावट स्पर्धा संपन्न* *भाजपा जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचे...

वणी विधानसभेत ( उबाठा) नांदेकर आणि देरकर मधिल मतभेद चव्हाट्यावर

वणी :- माजी आमदार तथा शिवसेनेचे (उबाठा) गटाचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी आज दिनांक ७ ऑगष्ट रोजी दुपारी वणी येथील...