Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / भालर ग्रामवासीयांचे...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण
ads images

बिडीओद्वारे कंपनीला देण्यात आलेल्या नाहरकत परवानग्या रद्द करण्यात याव्यात व होत असलेले अनधिकृत बांधकाम थांबवावे या मागण्यासाठी उपोषण

वणी:आचारसंहितेच्या काळात गटविकास अधिकारी,वणी यांनी हारमोनी मिनरल्स कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक आरोप भालर ग्रामपंचायतीने केला आहे. कंपनीला देण्यात आलेल्या नाहरकत परवानग्या रद्द करण्यात याव्यात व होत असलेले अनधिकृत बांधकाम थांबवावे, यासाठी कंपनी समोर आमरण उपोषण ग्रामपंचायत व समस्त भालर ग्रामवासी यांनी सुरू केले आहे.भालर गावालगतच मे. हारमोनी मिनरल्स कंपनीचे बांधकाम अनधिकृतरित्या सुरु आहे. ग्रामपंचायतीने कोणतीही नाहरकत परवानगी दिलेली नाही. अकृषक व बांधकाम परवानगी मिळण्यापुर्वीच कंपनीच्या वतीने मागील दोन महिन्या पासुन बांधकाम करण्यात येत आहे. संबंधीत बांधकाम अनधिकृत असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे.अनधिकृत बांधकामाबाबत ग्रामपंचायतीने अनेकदा तक्रारी केल्या आहेत. त्याप्रमाणेच भालर गावाच्या हद्दीत कंपनीची एक शाखा सुरु असुन राॅकवेल मिनरल्स असे कंपनीचे नाव असुन या कंपनीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदुषणामुळे ग्रामस्थ बेजार झाले आहेत.ती ही कंपनी बंद करण्यात यावी.पुन्हा नव्याने होणाऱ्या हारमोनी कंपनीमुळे प्रदुषणात वाढ होणार असुन भविष्यात अनेक दुष्परिणामाला सामोरे जावे लागणार आहे यामुळेच ग्रामस्थ कंपनीला विरोध करत आहेत.आचारसहितेच्या काळात हारमोनी कंपनीला गट विकास अधिकारी यांनी नाहरकत प्रमाणपत्र देवून ग्रामपंचायतच्या अधिकाराचे हनन केल्याचा आरोप ग्रामपंचायत व गावकरी करत आहे. तसेच पंचायत समितीचा जाहिरनामा 16 मे ला ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आला असुन त्याची मुदत 17 जुन पर्यंत आहे व त्यानंतर आक्षेप व सुनावणी होईल असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. तर सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी कंपनीच्या आर्थिक व राजकीय दबावाला बळी पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.सदर कंपनीचे अनधिकृतपणे सुरु असलेले बांधकाम बंद करून केलेले संपूर्ण बांधकाम पाडण्यात यावे व सदर कंपनीला दिल्या गेलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यात याव्या या करिता ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच सदस्य व समस्त गावकरी मे. हारमोनी मिनरल्स या कंपनीच्या विरोधात  आंदोलन करत आहेत तर समस्त गावकरी आमरण उपोषणाला बसले आहे.मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण सुरू च राहणार असल्याचा गावकऱ्यांनी इशारा दिला आहे.

Advertisement

Advertisement

ताज्या बातम्या

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार 21 October, 2024

बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या गंगन्ना ड्यागर्लावार परिवाराचा सत्कार

झरी :गगन्ना ड्यागर्लावार व त्यांच्या परिवाराच्या सगळ्या सदस्यानी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुर येथे बौद्ध धर्माची...

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे*    *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* 21 October, 2024

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न*

*नाभिक समाज संघटनेचे कार्य कौतुकास्पद - भूषण फुसे* *नगाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव. 21 October, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश संघटक सचिव विजय नगराळे व डॉ. सौ.संचिता विजय नगराळे यांचे चिरंजीव.

शुभेच्छुक:-आई, वडील आजी, व आप्त परिवार तसेच मित्र मंडळ....

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला 20 October, 2024

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती* 20 October, 2024

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती*

*गोंडपिपरी येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* डॉ अशोक कूडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश : गोंडपिपरी...

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी*    *भुषन फुसे यांची मागणी* 19 October, 2024

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* *भुषन फुसे यांची मागणी*

*कोरपणा येते स्टेट बँक देण्यात यावी* भुषन फुसे यांची मागणी ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपणा:-एकीकडे...

वणीतील बातम्या

बीजेपीचा वणी विधानसभा क्षेत्राचा उमेदवार ठरला

वणी :भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्रातील एकूण 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा...

यवतमाळ येथे वधू-वर परिचय मेळावा आयोजन.

वणी:- यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील नगाजी महाराज देवस्थान येथे १८ ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा...