Home / चंद्रपूर - जिल्हा / ब्रम्हपुरी / ब्रम्हपुरीत ऑटो चालकाची...

चंद्रपूर - जिल्हा    |    ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरीत ऑटो चालकाची मनमानी, प्रवासी साठी ट्रॅव्हल्स वाहकाला मारहाण.

ब्रम्हपुरीत ऑटो चालकाची मनमानी, प्रवासी साठी ट्रॅव्हल्स वाहकाला मारहाण.

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांच्या मुजोरीवर प्रतिबंध आणण्याची मागणी

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी-नागभीड मार्गांवर प्रवाश्यांसाठी चालकांची मोठी मनमानी व दादागिरी सुरू असून शनिवारला सकाळ सुमारास घडलेल्या एका घटनेत ऑटो चालकाने माझा प्रवासी का घेतला...? या शुल्लक कारणासाठी ट्रॅव्हल्स वाहकाला भर चौकात मारहाण केल्याची घटना घडली. 

शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणारे काही चालक मुजोरवृत्तीने भररस्त्यावर मनमानी करीत असल्याने यावर पोलिसांनी कार्यवाही करावी अशी मागणी होतं आहे.

 

शनिवार सकाळला चंद्रपूर वरून ब्रम्हपुरी कडे येणारी ट्रॅव्हल्स नागभिड मार्गे येत असतांना नागभीड -ब्रम्हपुरी मार्गातील भिकेश्वर येथून काही कॉलेजच्या विद्यार्थिनी कॉलेज मध्ये काही अर्जंट कामे असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्स वाहक नामे प्रवीण रामाजी धानोरकर रा. जवराबोडी याला विनंती केल्याने त्या वाहकाने विद्यार्थी मुलांचे शैक्षणिक कार्य व त्यांची गरज बघता ट्रॅव्हल्स मध्ये बसवले मात्र रस्त्यातून माझे प्रवासी का घेतले..? असे विचारणा करीत शुल्लक कारणासाठी वाद विकोपाला नेत ऑटो चालक सुनील नंदुरकर याने ट्रॅव्हल वाहकास मारहाण केली. या घटनेची वाहक प्रवीण धानोरकर याने त्याला मारहाण करणाऱ्या ऑटो चालक सुनील नंदुरकर विरुद्ध पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे तक्रार नोंदवली असून कलम 323 अंतर्गत अदखलपात्र गुन्हाची नोंद पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे झालेली आहे.

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक -वाहकांकडून याआधी सुध्दा असे प्रकार भरचौकात अनेकदा घडत असून याचा त्रास सामान्य प्रवास्यांना सुद्धा करावा लागतो चालक- चालकांतील क्षेत्रनिहाय नियमावलीच्या वादाचा राग साधारण प्रवाशावर काढून भररस्त्यात हमरीतुमरी ची भाषा वापरत असल्याने सामान्य नागरिकांस   नाहक अपमान सहन करावं लागत आहे .

पोलीस प्रशासनाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष देऊन दादागिरी व मनमानी करणाऱ्यांवर कारवाई केल्यास गुंड प्रवृत्तीच्या लोकांची हिम्मत बळावणार नाही व पोलिसांनी अशा प्रवृतीवर वेळीच कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सर्व स्तरावरून होतं आहे

ताज्या बातम्या

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम. 20 September, 2024

वणी येथे येणार नवरात्रात तुळजापूर भवानी मातेची अखंड ज्योत, नवशक्ती दुर्गा माता मंदिराचा अभिनव उपक्रम.

वणी : या वर्षी नवरात्र महोत्सवात वणी येथे प्रसिद्ध नवशक्ती दुर्गा माता मंदिर आंबेडकर चौक वणी येथील समितीने महाराष्ट्रातील...

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य,  विजयबाबू चोरडिया. 20 September, 2024

मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य, विजयबाबू चोरडिया.

वणी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने अपंगाना सायकल तर महिलांना...

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान. 20 September, 2024

अवैध दारू विक्री पकडणाऱ्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान.

वणी:- मारेगाव तालुक्यातील वनजादेवी आणि गौंड बुरांडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

ब्रम्हपुरीतील बातम्या

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू*

*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

पोलिसवाला गुंड सुधाकर अंभोरे याने ट्रॅव्हल्स चालकाचे डॊके फोडले

घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...

भरे चौराहे मे थानेदार सुधाकर अंबोरे ने ट्रॅव्हल्स चालक का डंडे से सर फोडा

ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...