Home / चंद्रपूर - जिल्हा / *ना. सुधीर मुनगंटीवार...

चंद्रपूर - जिल्हा

*ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार प्रशासनातर्फे नकोडा-मुंगोली पुलाची पाहणी*

*ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार प्रशासनातर्फे नकोडा-मुंगोली पुलाची पाहणी*

*माजी जि. प. सदस्य विजय पिदूरकर यांच्या मागणीला यश*

घुग्घुस:

  नकोडा-मुंगोली पुलाची दयनीय अवस्था मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांना कळताच त्यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे सा. बां. वी. चे कार्यकारी अभियंता यांना वर्धा नदीच्या नकोडा-मुंगोली पुलाची मंगळवार, १६ मे रोजी सकाळी १० वाजता पाहणी करण्यासाठी पत्र मिळाले.

त्याअनुषंगाने यवतमाळ माजी जि.प. सदस्य विजय पिदूरकर, चंद्रपूर माजी जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, चंद्रपूर सा. बां. वि. कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, उप अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, वेकोलि मुंगोली उपक्षेत्रीय प्रबंधक हनुमंत साळुंखे, वेकोलि स्थापत्य अभियंता श्रीमीना, साखरा सरपंच निलेश पिंपळकर, कोलगाव सरपंच गणेश जेनेकर, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, सदस्य रजत तुराणकर, ऋषी कोवे, माथोली सरपंच ज्योती माथुलकर, चिंचोली सरपंच शालिनी सलामे, शिवणी ग्रा. पं. सदस्य विश्वास बोरपे, साखरा ग्रा. पं. सदस्य निखिल उपासे, माथोली ग्रा. पं. सदस्य कुणाल डोहे, मुंगोली ग्रा. पं. सदस्य जिवन अतकारे, मुंगोली माजी उपसरपंच गणेश रोडे, माथोली माजी सरपंच सुधाकर बोबडे यांनी संयुक्तरित्या वर्धा नदीच्या नकोडा-मुंगोली पुलाची पाहणी केली. पाहणी दरम्यान हा पुल पायदळ व दुचाकी वाहतुकीसाठी योग्य असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले तसेच निरीक्षण करून लवकरच पायदळ व दुचाकी वाहतुकीसाठी सुरु करण्यात येणार आहे.

मौजा मुंगोली जिल्हा यवतमाळ ते नकोडा चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा जडवाहतुकीस प्रतिबंधित पुलाचे निरीक्षण करून पदाचारी व दुचाकी वाहतुकीस परवानगी देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी वेकोलि महाप्रबंध यांना पत्र दिले आहे.

यवतमाळचे माजी जि. प. सदस्य  विजय पिदूरकर यांनी वर्धा नदीच्या नकोडा-मुंगोली पुलाचे निरीक्षण करून पदाचारी व दुचाकी वाहतुकीस परवानगी देण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे निवेदनातून पाठपुरावा केला.

मुंगोली व १५ गावांचा संपर्क घुग्घुस या औद्योगिक शहराशी आहे. क्षतिग्रस्त झाल्याने काही महिन्यापासून नकोडा- मुंगोली पुल हा वाहतुकीसाठी वेकोलिने बंद केला आहे. त्यामुळे वेकोलिचे कामगार, मुंगोली परिसरातील अनेक गावातील विद्यार्थी व नागरिकांचे घुग्घुसकडे ये-जा करणे बंद झाले.  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे नागरिकांना बाजार पेठ, वैद्यकीय सुविधे साठीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच वेकोलि कामगारांना ये जा करण्यासाठी मोठया अडचणीचा सामना करावा लागत आहे. जवळपास ४० किमी अंतराचा फेरा पार करून मुंगोली-घुग्घुस असा प्रवास करावा लागत आहे.

त्याअनुषंगाने माजी जि.प.सदस्य विजय पिदूरकर यांनी निवेदनातून मागणी केली होती.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...