Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *सावित्रीबाई फुले यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाईटवर कारवाई करण्यात यावी*

*सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह  लेख लिहिणाऱ्या इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाईटवर कारवाई करण्यात यावी*

*सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह  लेख लिहिणाऱ्या इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट वेबसाईटवर कारवाई करण्यात यावी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले " यांच्या बद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या " इंडक्ट टेल्स " आणि " हिंदू पोस्ट " वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन सावली पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना  देण्यात आले .

    सविस्तर वृत्त असे की , " इंडिक्ट टेल्स " आणि " हिंदू पोस्ट " नामक मनुवादी वृत्ती असलेल्या भारतीय स्त्री  शिक्षणाच्या जनक , आद्य समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेले आहे . शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडक्ट टेल्स ही वेबसाईट चालवते . यात सावित्रीबाई फुले यांची शाळा म्हणजे ब्रिटिश सैनिकांना मुली पुरवण्याची सोय , अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखांमध्ये करण्यात आलेली आहे . सावित्रीबाई फुलेंच्या  कामाबद्दल " इंडीक टेल्स " च्या लेखात अतिशय अपमान जनक भाषेचा वापर करण्यात आलेला आहे . हे अत्यंत वेदनादाही आहे . शिव - फुले - शाहू - आंबेडकरांच्या महाराष्ट्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संताप जनक आणि घाणेरडा असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत .

     क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं . महिलांना शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे , शेणाचे प्रहार सुद्धा आपल्या अंगावर झेलले . समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले . या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आजही समाजातील दुष्ट प्रवृत्ती कडून प्रहार केल्या जात आहे . एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर चिखल फेक करीत आहेत . या पोर्टलवर इतिहासाची पुनर मांडणी या नावावर अक्षरशा इतिहासाची मोडतोड सुरू आहे . ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे .

     क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बदनामी बाबतचा विषय शासनाने गांभीर्याने घेऊन आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या " इंडिक टेल्स " आणि " हिंदू पोस्ट " वेबसाईटवर बंदी आणून सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सावली येथील अनिल गुरनुले  सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरदीप कोनपत्तिवार  नगरपंचायत सभापती नितेश रस्से ,  सभापती प्रीतम गेडाम  नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले , सरपंच सुनील पाल , मनोज चौधरी , किशोर घोटेकर , श्रीधर सोनुले , दिनकर वाघाडे  सुनील ढोले , कमलेश गेडाम , प्रशांत राइंचवार यांनी ठाणेदार सावली यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे .

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...