Home / चंद्रपूर - जिल्हा / *बाबूपेठ स्मशानभूमीच्या...

चंद्रपूर - जिल्हा

*बाबूपेठ स्मशानभूमीच्या बांधकामात चक्क मातीमीश्रीत काळी रेती चा वापर आप चे राजु कुडे यांनी उघडकीस आणला गैरप्रकार*

*बाबूपेठ स्मशानभूमीच्या बांधकामात चक्क मातीमीश्रीत काळी रेती चा वापर आप चे राजु कुडे यांनी उघडकीस आणला गैरप्रकार*

*बाबूपेठ स्मशानभूमीच्या बांधकामात चक्क मातीमीश्रीत काळी रेती चा वापर आप चे राजु कुडे यांनी उघडकीस आणला गैरप्रकार*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

चंद्रपूर:- आम आदमी पार्टी तर्फे शहरातील बाबूपेठ परिसरात स्मशानभूमीची दयनीय अवस्था असल्याचे मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्याच्या सौंदर्यकरणाचे कामाकरिता मनपाला सतत पाठपुरावा केल्यानंतर दलित विकास निधी मधून कोट्यवधीचा निधि मंजूर झाला. सोबतच त्या ठिकाणी काम देखील सुरू झाले परंतू सुरू असलेले काम हे निष्कृष्ट दर्ज्याचे असल्याची तक्रार आप च्या कार्यालयात आली तसेच आप चे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी पाहणी केली असता त्याठिकाणी संबंधित कंत्राटदार काळी रेती वापरत असल्याचे निष्पन्न झाले. सोबतच वॉल कम्पाउंड चे कॉलम चुकीच्या पद्दतीने घेतलेले आढळले. याबाबत मनपाचे इंजिनिअर पवार यांना आप तर्फे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली यावरुन आप च्या शिष्टमंडळाने त्यांना काम बंद करायला सांगितले. आणि जो पर्यंत ही रेती येथून उचलणार नाही व कॉलम व्यवस्थित करनार नाही तो पर्यंत काम सुरू करु नये असे संबंधित इंजिनिअर यांना सांगण्यात आले. माती मिश्रीत काळी रेती चा वापर डब्लुसीएल करते ती खराब रेती सरकारी कामाकरीता यांना कशी काय मिळाली आणि ते कामात वापरत असताना मनपाचे इंजिनियर झोपा काढत आहेत का? असा प्रश्न आपने उपस्थित केलेला  आहे. यावर आयुक्तांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी आप तर्फे करण्यात आली आहे जर कारवाई न झाल्यास आंदोलनाची चेतावणी सुद्धा आप तर्फे देण्यात आली आहे.

यावेळेस आप चे शहर अध्यक्ष योगेश गोखरे, शहर सचिव राजू कुडे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, संघटन मंत्री रहेमान खान पठाण, अनुप तेलतुंबडे,  जयदेव देवगडे, अजय बाथव, पवन प्रसाद, योगेश बिसेन, कृष्णा रणदिवे हे उपस्थित होते .

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...