Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *करंजी, आक्सापूर च्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*करंजी, आक्सापूर च्या नुकसानग्रस्तांना काँग्रेसचा मदतीचा हात* *माजी मंत्री वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष आ. धोटे यांनी केले पिडीतांचे सांत्वन*

*करंजी, आक्सापूर च्या नुकसानग्रस्तांना काँग्रेसचा मदतीचा हात*    *माजी मंत्री वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष आ. धोटे यांनी केले पिडीतांचे सांत्वन*

*करंजी, आक्सापूर च्या नुकसानग्रस्तांना काँग्रेसचा मदतीचा हात*

 

माजी मंत्री वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष आ. धोटे यांनी केले पिडीतांचे सांत्वन

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

गोंडपीपरी  :-- चंद्रपूर जिल्ह्य़ात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीने गोंडपीपरी तालुक्यातील मौजा आक्सापूर येथील मालगुजारी तलाव गट क्र. १३० व मौजा करंजी येथील मालगुजारी तलाव गट क्र. २८४  तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. तसेच करंजी येथील अनेकांच्या घरात तलावाचे पाणी शिरल्याने घरातील अनाज व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला अतिवृष्टीमुळे या गावावर ओढवलेल्या संकटाची वस्तूस्थीती कथन केली आणि तासाभरात संपूर्ण यंत्रणा सज्ज होऊन येथे मदत कार्याला सुरुवात झाली. आज माजी मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी काँग्रेसच्या वतीने येथील नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देऊन जीवनावश्यक वस्तू व अन्य खरेदीसाठी आर्थिक मदत केली. परिसराची पाहणी करून नुकसानग्रस्तांच्या व्यथा जाणून त्यांचे सांत्वन केले. काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहेत. आवश्यक सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी सरकारला बाध्य करू असे आश्वस्त केले. संबधित अधिकाऱ्यांना अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या तलावाचे, शेतजमिनीचे आणि घरांचे पंचनामे  तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकरी, ग्रामस्थांना आवश्यक सर्व प्रकारची मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच इतर क्षतिग्रस्त तलावाची पाहणी करून अशा घटना कुठे घडू नयेत याची खबरदारी घेण्यात यावी अशा सुचना केल्या.

        या प्रसंगी करंजी येथील लिंगाजी गुरमेट्टीवार, अनिल  गुरमेट्टीवार, आनंदराव मोहुर्ले, आयाजी गावातुरे, सुभाष मोहुर्ले, गोमती मोहुर्ले, हनुमंतू मोहुर्ले, बापुजी टेकाम, रामदास सोयाम, ताराबाई बामणे, विजय बामणे, प्रभाकर कोडापे, रामदास गोहणे, बडीराज पचारे, पत्रूबाई गोहणे, झुंगाजी भोयर, किशोर बावणे, काशिनाथ बावणे, रेखाबाई राठोड यासह अनेक नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच प्रशासनाला सांगून धान्य व इतर साहित्य पुरविण्यात आले.

       या प्रसंगी गोंडपिपरी चे तहसीलदार शुभम बहाकर,  गटविकास अधिकारी शालिक मावलीकर, कार्यकारी अभियंता प्रियांका रायपुरे, जलसंधारण विभाग गोंडपिपरी, काँग्रेसचे पदाधिकारी संतोष रावत, विनायक बांगळे, नंदू नांगरकर, घनश्याम मुलचंदाणी, अब्दुल करीम, तुकाराम झाडे, देविदासजी सातपुते, निलेश संगमवार, श्रीनिवास कुंदुनिरीवार, मनोज नागापुरे, अशोक रेचनकर, देवेंद्र बट्टे, संतोष बंडावार, महेंद्र कुंघाटकर, सविता कुळमेथे, रिंकू देवगडे, वनिता वाघाडे, नीरज चापले, सचिन चिंतलवार सरपंच सरिता पेटकर, ग्रा प सदस्य आरती निमगडे यासह अन्य सदस्य, आशिष निमगडे, तुकेश वानोडे, कमलेश निमगडे, सुरेश श्रीवास्ताव, वैभव निमगडे,  सदस्य ग्राम पंचायत करंजी  निखील बावणे , शितल वाढई, संगीता निमगडे, महेंद्र कुंघाटकर सदस्य आक्सापूर, ऋषीजी धोडरे माजी सरपंच, नीरज चापले, सुरेश वैरागडे पोलीस पाटील अक्सापूर, यासह जिल्हा काँग्रेस, गोंडपीपरी काँग्रेस, बल्लारपूर काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

गोंडपिपरीतील बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन*

*आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी...

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...