Home / चंद्रपूर - जिल्हा / ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार...

चंद्रपूर - जिल्हा

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्गुस येथे भव्य मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, चष्मे वाटप व महाआरोग्य शिबीराचे आयोजन.*

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्गुस येथे भव्य मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, चष्मे वाटप व महाआरोग्य शिबीराचे आयोजन.*

लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणजेच सेवेचे दुसरे रुप! - देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन.*

 

 

*७३९१ रुग्णांची तपासणी व विविध आजारांचे निदान.*

 

घुग्घूस;

रविवार, ३० जूलै.

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही घुग्घुस येथील प्रयास सभागृहात भव्य मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, चष्मे वाटप व महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.

या महाआरोग्य शिबीरास गडचिरोली-चिमुर लोकसभेचे खासदार अशोकभाऊ नेते, वर्धा लोकसभेचे खासदार रामदासजी तडस, भंडारा-गोंदिया लोकसभेचे खासदार सुनिलजी मेंढे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी विनय गौडा जि. सी., जिल्हा पोलीस अधीक्षक रविन्द्रसिंह परदेशी, चंद्रपूरचे वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, वनप्रबोधनीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, विनोबा भावे रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभुदय मेघे यांचे शुभहस्ते दिपप्रज्जवलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

 

या कार्यक्रमास लॉयड्स मेटल्सचे प्लांटहेड संजयकुमार, एसीसी सिमेंट कंपनीचे प्लांटहेड अनिल गुप्ता, लाॅयड्स मेटलचे पवन मेश्राम, चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुटफाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, नागपूरचे शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी आर. पी. गहलोत, वर्ध्याचे माजी जि. प. सभापती मिलिंद भेंडे, महाआरोग्य शिबीर प्रकल्प संचालक डॉ. रवी अल्लूरवार, डॉ. मंगेश टिपणीस, डॉ. सुशील मुंदडा, डॉ. अजय दुद्दलवार, गडचिरोलीचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, डॉ. अजय मेहरा, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, डॉ. अमल पोद्दार, डॉ. भुक्ते, डॉ. सुरेश कोल्हे, डॉ. आईंचवार, डॉ. सुरभी मेहरा, डॉ. शुक्ला साहेब, डॉ. मन्सुर अली चिनी, गोपाल हेगडे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि. प. सभापती सौ. नितू चौधरी, निरिक्षण तांड्रा, विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य साजण गोहणे, सिनू इसारप, रत्नेश सिंग, राजेश मोरपाका, अजय आमटे, बबलू सातपुते, नकोड्याचे सरपंच किरण बांदूरकर, चिन्नाजी नलभोगा, तुलसीदास ढवस, दिलीप रामटेके, प्रवीण सोदारी, सुरेंद्र भोंगळे, नितीन काळे, सुरेंद्र जोगी, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, हेमंत पाझारे, दिलीप कांबळे, वैशाली ढवस, सुचिता लुटे, पूजा दुर्गम, नंदा कांबळे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरणताई बोढे, राजू डाकूर, गणेश खुटेमाटे, हेमंत कुमार व घुग्घुस शहरासह परीसरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक पर मनोगतात, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, सेवेचे दुसरे रुप म्हणजे ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सेवाभावी व्यक्तिमत्त्वाकडे पाहिल्या जाते. त्यामुळे त्यांच्या नावाला साजेसा असा सेवा उपक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस साजरा करावा, या उद्देशाने ३० जूलै हा दिवस संपुर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. आम्ही गेल्या ०८ वर्षांपासून घुग्गुस व पोंभुर्णा येथे अशा पद्धतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करून रुग्णसेवा करत असतो. या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसाला एकाच छताखाली आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध व्हावी, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलवण्यासाठी मदत करता यावी हे उद्दिष्ट घेऊन आम्ही या महाआरोग्य शिबीराचे आयोजन करतो. मागील चार ते पाच वर्षांपासून ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून शेकडो गोरगरिब, निराधार, वृद्ध, वंचितांसाठी आम्ही सेवामग्न आहोतच पण त्याबरोबरच अशा महाआरोग्य शिबीराच्या आयोजनातून एकाच दिवशी एका छताखाली व्यापक प्रमाणात गरजूंना आरोग्यविषयक सोयीसुविधा देतांना आत्मीय समाधान वाटते.

पुढे बोलताना, महाराष्ट्राच्या प्रगतीत योगदान देतानाच ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी एकेकाळी मागासलेला जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला नववैभव मिळवून देतच गोरगरिब, गरजूंच्या सेवेला नेहमी प्राधान्य दिले. नरसेवा हीच नारायण सेवा म्हणून भाऊ झटत असतात. अशा कार्यसम्राट लोकनेत्याला उदंड व निरोगी आयुष्य लाभो आणि महाराष्ट्राच्या सेवेचे पुण्यकर्म भाऊंच्या हातून घडोत राहो, हीच आजच्या शुभप्रसंगी उपस्थित आपणासर्वांच्या वतीने मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असेही ते म्हणाले.

त्यानंतर, खासदार अशोकभाऊ नेते, जिल्हाधिकारी विनय गौडा जि. सी., जिल्हा पोलीस अधीक्षक रविन्द्रसिंह परदेशी, चंद्रपूरचे वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, वनप्रबोधनीचे संचालक श्रीनिवास रेड्डी आणि विनोबा भावे रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभुदय मेघे यांनीही आपल्या मनोगतातून महाआरोग्य शिबीराच्या आयोजनाचे कौतुक करत ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

 

या शिबीरात चंद्रपूर, वर्धा आणि नागपूरच्या तज्ञ व नामांकित डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. नेत्रतपासणी, ईसीजी, त्वचारोग, दंतरोग, स्त्रीरोग, बालरोग, कर्करोग, न्युरो, अस्तिरोग इ. आजारांवर तपासणी पार पडली, तर मध्य भारतातील एकमेव अशा इंडीयन कॅन्सर इन्स्टिट्यूट माध्यमातुन  महिलांच्या स्तनांच्या व गर्भपिशवीच्या कर्करोगाचे निदान करणारी दोन सुसज्ज अद्ययावत वाहने व हृदयाच्या तपासणीकरीता ईको कार्डीयोग्राफी मशीन सुद्धा याठिकाणी उपलब्ध होती. जवळपास सर्वच प्रकारच्या आजारांवर शिबिरात आलेल्या नागरिकांना तज्ञ डाॅक्टरांकडून निःशुल्क औषधोपचार व मार्गदर्शन मिळाले. दरवर्षी प्रमाणे यंदाही या महाआरोग्य शिबीराचा घुग्घुस शहर व परिसरातील ७३९१ नागरीकांनी लाभ घेतला.

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...