स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांची अवैद्य सुगंधीत तंबाखु, पो.स्टे. गोंडपिपरी हददीत कार्यवाही.
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
गोंडपिपरी :-आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. मौजा अडेगाव, वढोली, दरूर, पारगाव, व नदी काठच्या परिसरात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची पाहणी केली. तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
या प्रसंगी आ धोटे यांनी ग्रामस्थांकडून अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये शेतीच्या नुकसानीचे पंचनामे, पांदण रस्त्याच्या अडचणी, घरांची पडझड आदी समस्यांचे गाऱ्हाणे नागरिकांनी आमदारांपुढे कथन केले. यावेळी आमदारांनी समंधीत अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्याचे निर्देश देत मी स्वतः लक्ष घालणार तुमच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन दिले. सोबतच मौजा चेकविठ्ठलवाडा येथील योगिता प्रशांत खोब्रागडे यांचा दि. २५ जुलै २०२३ ला शेतात काम करीत असतांना वीज पडून मृत्यू झाला. त्यांचे पती प्रशांत कचरूजी खोब्रागडे व दोन मुले यांना आ. धोटे यांच्या हस्ते ४ लक्ष रुपये शासकीय मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. मौजा चेकबापूर (सकमुर) येथील शेतकरी विलास मोडया जल्लावार यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नी श्रीमती छाया विलास जल्लावार यांना १ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. मौजा चिवंडा येथील शेतकरी गोविंदा लिंगा टेकम यांचा दि. २६ जुलै २०२३ ला वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी श्रीमती लिलाबाई गोविंदा टेकाम यांना ४ लक्ष रुपये शासकीय मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. मागील महिन्यात आलेल्या पुरात दिवाकर कोहपरे या शेतकऱ्याचे दोन बैल पाण्यात वाहून गेले. त्यांना यावेळी ५७ हजारांचा मदतीचा चेक देण्यात आला. नुकसानीचे पंचनामे योग्य करा शेतकरी मदतीपासून वंचीत राहू नये यासाठी प्राथमिक याद्या ग्रामपंचायत बाहेर लावावे असे निर्देश दिले.
या प्रसंगी तहसीलदार शुभम बहाकर, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर, तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, तलाठी लोणकर, ग्रामसेवक देवराव कोडापे, गोंडपीपरी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, महिला तालुकाध्यक्षा सोनी दिवसे, कार्याध्यक्ष तथा कृ बा स संचालक निलेश संगमवार, शहराध्यक्ष देवेन्द्र बट्टे, उपाध्यक्ष नितेश मेश्राम, सरपंच रमेश बारसागडे संचालक अशोक रेचनकर, माजी संचालक शंभू येलेकर, यु. काँ अध्यक्ष संतोष बंडावार, अनिल कोरडे यशवंत अलोने पोलिस पाटील चेक विठ्ठलवाडा, कचरू खोब्रागडे, मौजा अडेगाव येथील रेखा चौधरी सरपंच, शालीक झाडे, पुरुषोत्तम रेचनकार, विजय चौधरी, संजय धुडसे, अल्का नागापूर, सोनी उंबरकर, संतोष कोवे, दामोदर राऊत, मौजा चिवंडा येथील संतोष कोवे सरपंच, सुनिता आत्राम, आशा आत्राम पोलीस पाटील, दिपक पेंदोर, विठ्ठल सोयाम, विनोद टेकाम यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक...
*सामाजिक राजकीय विषयावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे विचार मंथन* *तेली समाजाच्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढणार* ✍️दिनेश...
वणी :- भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात...
उपरोक्त विषयांन्वये उल्लेखनिय कामगिरी अशी आहे की, पोलीस ठाणे, बल्लारपुर येथे दि. 13/09/2024 रोजी फिर्यादी नामे श्रीमती. मालन...
वणी:- वणी ते घुग्गुस चंद्रपूर हा राज्य मार्ग वर्दळीचा आहे.या रस्त्यावर वर्धा नदी लगत बेलोरा चेक पोस्टयेथे वेकोलीची...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...
*आ. सुभाष धोटेंनी घेतला ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकामाचा आढावा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*सेवानिवृत्तांनी समज बांधवांच्या उन्नतीसाठी हातभर लावावा : आमदार सुभाष धोटे* खैरे कुणबी कर्मचारी समाज मंडळाच्या...
*आ. सुभाष धोटेंनी केले मृतक राजेश झाडे च्या कुटुंबीयांचे सांत्वन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी...