Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *"कॅन्सर तपासणी हॉस्पिटलला...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*"कॅन्सर तपासणी हॉस्पिटलला सावली तालुक्यातील व्याहाड बुज केंद्रावर उत्स्पुर्त प्रतिसाद*

*

*कॅन्सर तपासणी हॉस्पिटलला  सावली तालुक्यातील व्याहाड बुज केंद्रावर उत्स्पुर्त प्रतिसाद*

 

*विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून  आज असंख्य कॅन्सरग्रस्त रुग्णांना वेळेआधी उपचार करून त्यांचा जीव वाचवला जाऊ शकतो,मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा माणून त्यांचे अविरत कार्य ही अभिनंदनीय बाब असून मी समस्त सावली तालुकावासीय जनतेकडून त्यांचे आभार मानतो--मा.नितीन गोहने, अध्यक्ष सावली तालुका काँग्रेस कमिटी*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- आज सावली तालुकातील व्याहाड बूज. येथे ग्राम काँग्रेस कमिटीतर्फे कॅन्सर तपासणी हॉस्पिटलचे सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीनजी गोहने, माजी सरपंच सौ.वंदना गुरनुले,माजी सरपंच मा.पितांबर वासेकर यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.ही कॅन्सर तपासणी हॉस्पिटल गाडी  ६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर हा पहिला टप्पा सावली तालुक्यातील नागरिकासाठी उपलब्ध असणार आहे.महाराष्ट्रातील ग्रामीण,आदिवासी आणि शहरी झोपडपट्टी वस्तीत राहणारे उपेक्षित आणि वंचित कुटुंब जे आर्थिक स्थितीमुळे कर्करोग तपासणी करू शकत नाही अश्या कुटुंबांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.स्क्रिनिंग आऊटपुटच्या आधारावर रुग्णाला पुढील तपासणीची आवश्यकता असल्यास डॉक्टरांची टीम रुग्णाला पुढील उपचारासाठी घेऊन जाईल. उपेक्षित लोकसंख्येला कर्करोगावर मोफत निदान आणि उपचारांचे फायदे देणे हे उपक्रमाचे अंतिम ध्येय आहे.वाढत्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी तसेच वेळेपूर्वीच कर्करोगाचे निदान व्हावे यासाठी विरोधी पक्षनेते व माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी अडीच कोटी रूपये खर्च करून 'कर्करोग निदान' करणारी रूग्णवाहिका जनसेवा हीच ईश्वर सेवा माणून समस्त जनतेला १५ जून २०२३ ला विशेष प्रयत्नातून जनतेस समर्पित केली.राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग चंद्रपूरात राबविण्यात येत आहे. अमेरिकेतील संस्थेशी करार करण्यात आला असून तज्ञ डॉक्टराचा चमू तपासणी करणार आहे. आज व्याहाड बुज येथे तब्बल २२४ नागरिकांनी कॅन्सरची तपासणी केली असून डॉक्टरांनी १० रुग्णांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल, नागपूर येथे पुढील उपचाराकरिता रेफर केले आहे. ह्या रूग्णवाहिकेमुळे कर्करोगाचे वेळीच निदान होवून रूग्णांला वेळीच उपचार उपलब्ध होणार आहे कॅन्सर तपासणी शिबिराच्या दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी व्याहाड बुज येथील उदघाट्नाला सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,माजी सभापति पं.स.सावली मा.राकेश पाटील गड्डमवार ,सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर कारडे ,व्याहाड बुजचे माजी सरपंच मा.पितांबर वासेकर,माजी सरपंच सौ.वंदनाताई गुरनुले, व्याहाड बूज.महिला काँग्रेस अध्यक्ष सौ.अर्चना संगिडवार ,  ग्रा.पं.सदस्य व्याहाड बुज मा.सुनील बोमनवार, सौ. रुपाली करकाडे, सौ.संगीता जेंगठे,तसेच मा.अनिल गुरनुले,मा.मेहबूब खान पठाण,मा.दीपक गद्देवार ,मा.अनिल पाल,मा.चेतन मोटघरे,मा. संजय चांदेकर,मा.रुमाजी कोहळे,मा.जयंत सांगिडवार ,मा.कवडू ठाकूर, बंडू चिप्पावार,मा.डोमाजी शेंडे, काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम ,मा.जगदीश वासेकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...