Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *मराठा समाजाचा ओबीसी...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश न करण्याबाबत सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र शासनास निवेदन*

*मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश न करण्याबाबत सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र शासनास निवेदन*

*मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश न करण्याबाबत सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र शासनास निवेदन*

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:- दिनांक१३ सप्टेंबर २०२२महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु असून मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे.मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे.या माध्यमातून १७ सप्टेंबर २०२३ ला जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे संपूर्ण ओबीसी बांधवातर्फे मोर्चा निघणार आहे यानिमित्याने सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे नियोजन व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.ओ.बी.सी ची बिहार सरकारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करण्यात यावी,ओ बी.सी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण झाले पाहिजे,मराठा समाजाला ओ बी.सी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यात येऊ नये.तसेच ओ बी.सी समाजातील लोकांना त्वरित घरकुल योजनेची अंबलबजावणी करण्यात यावी. इत्यादी मागण्याचे निवेदन सावली चे तहसीलदार मा.परीक्षित पाटील यांच्या  मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांना पाठविण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे सदस्य,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे, सावली तालुका महिला तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर,सावली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,माजी पं.स.सभापती मा.विजय कोरेवार,माजी उपसभापती मा.राजेंद्रजी भोयर, सावली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मा.अमरदीप कोनपत्तीवार, सावली शहर महिलाध्यक्ष सौ.भारती चौधरी,सावली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी, नगरसेविका सौ.साधना वाढई, सौ.ज्योती शिंदे,सौ.अंजली देवगडे,नगरसेवक मा.प्रीतम गेडाम,मा.नितेश रस्से, मा.गुणवंत सुरमवार,मा.सुनील पाल, मा.अनिल गुरनुले,मा.अनिल मशाखेत्री,मा.खुशाल राऊत,मा.पंकज कागदेलवार, मा.किशोर घोटेकार,मा.चंद्रशेखर नंदनवार,मा.श्रीकांत सांगिडवार, मा.शरद कन्नाके, मा.सुरेश निरुडवार, सौ.वंदना गुरनुले, मा.संजय मजोके, सौ.शिला गुरुनुले तसेच मा.कमलेश गेडाम आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

सावलीतील बातम्या

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान उद्या अर्ज दाखल करणार*

*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित*

*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...