Home / चंद्रपूर - जिल्हा / गोंडपिपरी / *अंगनवाडी सेविका व मदतनिस...

चंद्रपूर - जिल्हा    |    गोंडपिपरी

*अंगनवाडी सेविका व मदतनिस यांना सेवानिवृत्तीचा लाभ तातडीने द्या.* *आमदार सुभाष धोटे यांची महिला व बालकल्याण विभागाकडे मागणी.*

*अंगनवाडी सेविका व मदतनिस यांना सेवानिवृत्तीचा लाभ तातडीने द्या.*    *आमदार सुभाष धोटे यांची महिला व बालकल्याण विभागाकडे मागणी.*
ads images

*अंगनवाडी सेविका व मदतनिस यांना सेवानिवृत्तीचा लाभ तातडीने द्या.*

 

आमदार सुभाष धोटे यांची महिला व बालकल्याण विभागाकडे मागणी.

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

राजुरा  :-- चंद्रपूर जिल्ह्यातील  राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील व जिल्हातील इतर हि तालुक्यामधील अंगनवाडी सेविका व मदतनिस यांचे प्राप्त निवेदनानुसार वयाची 65 वर्ष पुर्ण झाल्यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अतंर्गत अंगनवाडी सेविका व मदतनिस म्हणुन कार्यरत असतांना अनेक अंगनवाडी सेविका व मदतनिस यांना मानधनी पदावरून त्यांचे वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त करण्यात आले आहे. परंतु आपल्या विभागाकडून अजुनही अनेकांना सेवा निवृत्ती नंतरचा लाभ देण्यात आलेला नाही. यातील काही सेवानिवृत्त कर्मचार्यांना जवळपास पाच वर्षाचा कालावधी पुर्ण होऊनही सेवा निवृत्तीचा लाभ मिळाला नसल्याने सेवानिवृच्या लाभापासून वंचीत आहेत, वृद्धापकाळात त्यांचेवर व कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ उद्भवलेली आहे. अनेक सेवानिवृत्त कर्मचारी मयत सुद्धा झालेले आहेत. याबाबत मंत्री आयुक्त यांचे कडे अनेकदा पाठपुरा केलेला आहे तसेच विधानसभेत तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून अनेकदा वृद्धांची अडचण निदर्शनास आणून दिली मात्र अजुनहि सेवानिवृत्त वृद्ध महिलांना न्याय मिळाला नाही सेवानिवृत्ती नंतरचा चा लाभ विमा कंपनी कडून देण्यात येत असल्याने तो मिळण्यास फार विलंब होत आहे त्यामुळे वृद्ध महिलांमध्ये शासनाचे धोरनाप्रती तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. विमा कंपनी सोबत झालेला करार रद्द करून सेवानिवृत्त महिलांना लाभांश अदा करण्याचे अधिकार जिल्हापरिषद स्तरावर देण्यात यावे. चंद्रपूर जिल्हातील १४९ सेवानिवृत्त, ८६ मय्यत ३४ राजीनामा व ५४ NFT Return असे एकूण ३२३ प्रलंबित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे देयक तातडीने अदा करण्याचे निर्देश संबंधीताना देण्यात यावे अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे महिला व बाल विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ताज्या बातम्या

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा 18 April, 2024

वणी येथील धनोजे कुणबी समाज संस्थेचा प्रतिभा धानोरकर यांना जाहीर पाठिंबा

वणी :- धनोजे कुणबी समाज संस्था, वणी रजिस्टर क्रमांक ८६५६ (य) ३०२ / २०२४ यांनी इंडिया आघाडीचे लोकसभेतील उमेदवार आमदार प्रतिभा...

शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन. 18 April, 2024

शिंदोला येथील रहिवाशांनी निवडणुकीवर घातलेला बहिष्कार मागे, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील शिंदोला येथील रहिवाशांनी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत एकमताने बहिष्कार टाकला होता.मात्र याच गावातील...

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर 18 April, 2024

लोकशाही पद्धतीने निवडून येऊन हुकूमशाही लादण्याचा मोदींचा प्रयत्न- कुमार केतकर

वणी:पंतप्रधान नरेंद्र मोदी अब की बार ४०० पारचा नारा देत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा व मोदी यांना २००...

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती*    *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर* 17 April, 2024

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर*

*बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद संविधानाचा मूलभूत पाया असता तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती* *मेंढोली येथे...

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी. 17 April, 2024

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी.

वणी : भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात...

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी 15 April, 2024

वेदड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

झरी : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने बिना डीजे वाजविता वेडद पो.अडेगाव ता.झरी जि.यवतमाळ येथे भीमजयंती...

गोंडपिपरीतील बातम्या

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो चषक-२०२४ अतंर्गत...

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024*

*???????????????????????? ???????? ???????????????????????? ????????????????????????????* *नमो चषक गोंडपिपरी | खो-खो स्पर्धा 28-02-2024* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी गोंडपिपरी:-नमो...

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश*

*गोंडपिपरी तालुक्यातील विविध पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये* *आमदार सुभाषभाऊ धोटेंच्या हस्ते काँग्रेस पक्षात...