आज दिनांक 15-01-2024 रोजी निंबाळा व चेक निंबाळा येथील तरुणांचा शिवसेना-युवासेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.!!
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील राजकारण गोंधळलेले असतांना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज निंबाळा व चेक निंबाळा येथील तरुणांनी शिवसेना-युवासेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना जिल्हा समन्वयक विनय धोबे यांच्या नेतृत्वात व युवासेना तालुका प्रमुख अक्षय कवासे यांच्या प्रयत्नाने चेक निंबाळा व मोठा निंबाळा येथील पिंटू शेरकी, राहुल मोगरे, प्रमोद आत्राम, संजय मडावी, बबलू रामटेके, आनंद तीतरे, नितेश बिल्लरवार, नवनाथ शेंडे, प्रज्योत गेडाम, अर्जुन निकोडे सह अनेक युवकांचा युवासेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेण्यात आला. यावेळी उपस्थित वसीमभाई खान,सिक्कीभाई खान, युवासेना तालुका प्रमुख अक्षय कवासे, युवासेना उपशहर प्रमुख सार्थक शिर्के यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.