Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / शेतकऱ्याच्या तक्रारीवरून...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

शेतकऱ्याच्या तक्रारीवरून निखार राईस मिल वर कारवाई चा बडगा

शेतकऱ्याच्या तक्रारीवरून निखार राईस मिल वर कारवाई चा बडगा

 

 

वैध मापण शास्त्र विभागाची कारवाई

 

 

भद्रावती, दि. १७ : शहरातील एका शेतकऱ्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे धानाचा उतारा कमी मिळाला तसेच वजन काटा केल्या जात नाही. या संबंधीची तक्रार दाखल केली होती. त्याअनुषंगाने वैध मापण शास्त्र विभागाकडून कारवाई करण्यात आली.

 

भद्रावती चे शेतकरी अनिल भोंग यांनी ३५ पोते धान तांदुळ काढण्यासाठी निखार राईस मिल, चंदनखेडा येथे नेले. त्यावर त्यांना फक्त १२ क्विंटल तांदूळ मिळाले. धानाचा उतारा अत्यंत कमी आल्याने त्यांनी राईस मिल मालक आणि तेथे काम करणाऱ्या व्यक्ती कडे तक्रार केली. परंतु त्यांनी शेतकऱ्याला न्याय दिला नाही. आपली फसवणूक झाली असे लक्षात येताच त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती कडे लिखित तक्रार दाखल केली.

 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती ने सदर तक्रार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, सदस्य, प्रवीण चीमूरकर यांचेकडे दिली.  प्रवीण चीमूरकर यांनी सदर तक्रार तहसीलदार भद्रावती आणि अध्यक्ष, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे केली. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य, प्रवीण चीमूरकर यांनी दि.३१ जानेवारीला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत हा विषय उचलुन धरला आणि पुरवठा विभागाकडून लगेच कारवाई करण्याचे पत्र काढण्यात आले.

 

वैध मापण शास्त्र विभागाचे निरिक्षक सुनील वाडे यांनी दि. १४ फेब्रुवारी ला निखार राईस मिल, चंदनखेडा येथे भेट देऊन तपासणी केली असता वजन काटा पडताळणी प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. त्यावर वाडे यांनी निखार राईस मिल वर कारवाई केली.

 

*चौकट :

माझे जवळपास ५ ते ६ क्विंटल चे नुकसान झाले असुन मला नुकसान भरपाई मिळाली पाहीजे. असे पुन्हा दुसऱ्या शेतकऱ्यांसोबत होऊ नये यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई करावी.

 

अनिल भोंग, शेतकरी, भद्रावती.

 

शेतकऱ्यानी आता ग्राहक अधिकार जाणुन घेण्याची गरज आहे. ग्राहक संरक्षण कायदा असुन सुद्धा ग्राहकांची फसवणूक होते ही चिंतेची बाब आहे. शेतकरी बांधवानी आता यावर आवाज उठवला पाहीजे. कोठेही आपली फसवणूक झाली असे वाटत असेल तर आवाज उठवा आणि तक्रार दाखल करा. आपल्याला न्याय नक्की मिळेल. ग्राहक संरक्षण कायदा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

 

 

ताज्या बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी* 14 May, 2024

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

घुग्गुसतील बातम्या

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील पद्मशाली समाजाच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी...