Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस / वर्धा नदीच्या चिंचोली...

चंद्रपूर - जिल्हा    |    घुग्गुस

वर्धा नदीच्या चिंचोली घाटावर बोटाच्या सहाय्याने रेती तश्करी

  वर्धा नदीच्या चिंचोली घाटावर बोटाच्या सहाय्याने रेती तश्करी

 

नियम,अटी व शर्तीचे उलंघन करीत राञ-दिवस रेती उत्खनन सुरु

 

नागरीकानी महसूल विभाग कडुन ट्रेझर बोट जप्त करण्याची मागणी केली

 

घुग्घुस :-वर्धा -नदीच्या वणी- तालूक्यातील चिंचोली रेती घाटावर नियम अटी व शर्तीचे उलंघन करीत सर्रास पणे अवैध रेतीचे उत्खनन सुरु असुन याकडे तहसीलदार यांनी लक्ष देण्याची गरज आहे.अशी मागणी नागरीका कडुन होत आहे.

 

मिळालेल्या आर्डर काॅपी अनुसार चिंचोली वर्धा नदी गट नं. ११,१२,१३,१४,१५ हा गाळ सफाई करण्याचा क्षेत्र आहे. गाळ मिश्रित वाळू उत्खननाचे क्षेत्र गट नं. ११ पासून ते १५ पर्यंत लंबी २०० मिटर, रुंदी २५ मिटर, खोली १.५ मिटर पर्यंत आहे.गाळ मिश्रित वाळू ब्रासमध्ये १७६५, टनामध्ये ८१३५ एकुण आहे.

 

प्रास्तावित डेपो गट मौजा शिंदोला क्र. ४७ उत्खनन करणे डेपो पर्यंत ८ किमी आहे. ३१/१०/२०२३ रोजी निविदा समिती समक्ष उघडण्यात आली. निविदा धारक धीरज दिगांबर पाते (बिल्डिंग मटेरियल सप्लायर ) मु. पो. गणेशपुर, कोंडावार ले-आउट, ता. वणी जि. यवतमाळ यांचे रुपये ४/- प्रतिटन दर सर्वात न्युनतम दराने गाळ वाळु सफाई करण्यासाठी काम प्राप्त झाले.

 

निविदेत दिलेल्या तपशीलीनुसार गाळ, गाळ मिश्रित वाळूचे उत्खनन करून उत्खनन केलेल्या गाळ मिश्रित वाळूची डेपो पर्यंत वाहतूक,डेपो निर्मिती व विक्री करणे तसेच व्यवस्थापन करणे अशा अटी शर्तीचे अर्ज अप्पर जिल्हाधिकारी कक्षात सादर केले गेले आहे.

 

अटी व शर्ती नुसार गाळ मिश्रित वाळूचे उत्खनन करण्याकरिता लोडर इत्यादी यंत्रसामग्रीचा वापर अनुज्ञॆय राहील. यंत्रसामुग्रीची माहिती संबंधित तहसीलदार यांना देणे बंधनकारक आहे. वाळू गटातून उत्खनन डेपो मिळाल्यापासून १५ दिवसात करणे आवश्यक आहे.

 

करारनामातील सर्व अटी व शर्तीचे पालन करने घाट धारकाला बंधनकारक आहे. तसेच गाळ, गाळ मिश्रित वाळू वाहतुकीसाठी ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलँड, लोडर इत्यादी वाहनांचे नंबरची यादी नोंदणीसह व आरटीओ कागदपत्रासह कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.

 

सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उत्खननाची अटी व शर्ती आहे. परंतु ट्रेझर बोटीच्या सहाय्याने वाहत्या पाण्याच्या धारेतून अवैध उत्खनन सर्रास पणे  हॉयवा ट्रकने व ट्रेझर बोटीच्या 8 व 10 फेब्रुवारी पासून रात्रेंदिवस उपसणे वाहते धारेतून सुरु आहे त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल पाण्यात बुडत आहे.

 

वणीचे तहसीलदार तसेच महसूल विभाग व पोलिस प्रशासनांनी वाळु तश्करी कडे लक्ष देऊन अवैध उत्खनन लवकर थांबवावे अशी मागणी नागरिक करीत आहे.

ताज्या बातम्या

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी* 14 May, 2024

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल. 13 May, 2024

स्वर्णलीलाची जिनेशा लोढा दहावीत तर ओम आकुलवार बारावीत अव्वल.

वणी :- केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावी व बारावी चा निकाल ऑनलाईन जाहीर केला. यात येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल शाळेने...

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम. 13 May, 2024

सुशगंगा पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम.

वणी.- स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही दहावी...

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

घुग्गुसतील बातम्या

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ची पोस्टे चंद्रपूर शहर परीसरात तंबाखु वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर धडक कारवाई.

घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...

पद्मशाली समाजाच्या वतीने विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस येथील पद्मशाली समाजाच्या वतीने नवनियुक्त भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी...