Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *तब्बल १० वर्षांनी काँग्रेसच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*तब्बल १० वर्षांनी काँग्रेसच्या उमेदवाराने जिंकली गडचिरोली लोकसभेची जागा* *काँग्रेस पक्षाचे डॉ.नामदेवराव किरसाण १ लाख ४० हजार २३४ मतांनी विजय*

*तब्बल १० वर्षांनी काँग्रेसच्या उमेदवाराने जिंकली गडचिरोली लोकसभेची जागा*    *काँग्रेस पक्षाचे डॉ.नामदेवराव किरसाण १ लाख ४० हजार २३४ मतांनी विजय*

*तब्बल १० वर्षांनी काँग्रेसच्या उमेदवाराने जिंकली गडचिरोली लोकसभेची जागा*

 

काँग्रेस पक्षाचे डॉ.नामदेवराव किरसाण १ लाख ४० हजार २३४ मतांनी विजय

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली:-लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये आज झालेल्या ४ जून रोजी झालेल्या मतगणनेच्या दिवशी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र येथे महाविकास आघाडी चे उमेदवार डॉ. नामदेव किरसान हे १ लाख ४० हजार २३४ मतांनी विजयी झालेले आहेत.डॉ नामदेव किरसान यांनी महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांचा जवळपास १ लाख ४० हजार २३४ मतांनी पराभव केलेला आहे.12 गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉ. नामदेवराव किरसान हे विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 6 लाख 17 हजार 792 मते प्राप्त झाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी हा निकाल जाहिर केला. डॉ. किरसान यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यावेळी उपस्थित होत्या.शासकीय कृषी महाविद्यालयात मतमोजणी प्रक्रिया झाली. अन्य उमेदवारांना प्राप्त मते अशोक नेते, भारतीय जनता पार्टी (476096), योगेश गोन्नाडे, बहुजन समाज पार्टी (19055), धीरज शेडमागे, जनसेवा गोंडवाना पार्टी (2174), बारीकराव मडावी, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी (2555), सुहास कुमरे, भीमसेना (2872), हितेश पांडूरंग मडावी, वंचित बहुजन आघाडी (15922), करण सयाम, अपक्ष (2789), विलास कोडापे, अपक्ष (4402), विनोद मडावी, अपक्ष (6126), नोटा (16714). एकूण वैध मते 11 लाख 66 हजार 497 अनुक्रमे मते घेतली आहेत.आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतलेल्या नामदेव किरसान यांनी कुठेही पिछाडी झाली नाही व जवळपास पूर्ण मतमोजणी च्या फेऱ्या पूर्ण होत पर्यंत आपले मताधिक्य कायम ठेवले. व आपला विजय पूर्ण केला.

*कार्यकर्त्यांच्या जल्लोष व विजयी रॅली*

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातून डॉ. नामदेव किरसान हे विजय झाल्याने क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गडचिरोली शहरात भव्य फटाक्यांची आतिषबाजी व रॅली काढून जल्लोष साजरा केला.

*गडचिरोली भाजपा कार्यालयात शुकशुकाट*

रोज गजबजलेल्या भारतीय जनता पार्टीच्या चामोर्शी रोडवरील कार्यालयात आज अशोक नेतेंच्या दारुण पराभवाने झाल्याने शुकशुकाट पसरला होता.

ताज्या बातम्या

वणी तहसील कार्यालयातील  पुरवठा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. 24 October, 2024

वणी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

वणी:- तहसील कार्यालय वणी येथील तालुका पुरवठा अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली आहे.आज...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न*    *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* 24 October, 2024

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना  उबाठा कडुन उमेदवारी जाहीर. 24 October, 2024

किरणताईच्या नवसाला पावली जानामाय, कासामाय, संजय देरकर यांना उबाठा कडुन उमेदवारी जाहीर.

वणी:- रस्सीखेच सुरु असलेल्या वणी विधानसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या उबाठा यांचे अधिकृत...

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल 24 October, 2024

मनसेचे राजु उंबरकर उद्या भव्य शक्तिप्रदर्शनासह करणार उमेदवारी अर्ज दाखल

वणी : विदर्भ दौऱ्यावर असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वणीच्या भेटीत पक्षाचे नेते राजु उंबरकर यांना उमेदवारी जाहीर...

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर 23 October, 2024

अखेर महाविकास आघाडीचा वणी विधानसभेचा उमेदवार जाहीर

वणी : वणी विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या कित्येक महिन्यापासून उत्सुकता लागलेल्या महाविकास आघाडीच्या वणी विधानसभा...

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न 23 October, 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर हुडकेश्वर द्वारा कोजागिरी उत्सव सम्पन्न

वणी :दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य...

सावलीतील बातम्या

*सावली तालुक्यात १७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन* *विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश - अंतर्गत रस्ते, सामजिक सभागृहांचा समावेश*

*सावली तालुक्यात १७ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन* *विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश - अंतर्गत...

*घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या- नितीन गोहने*

*घरकुलाचे पैसे उपलब्ध करून द्या- नितीन गोहने* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली :- सावली तालुक्यामध्ये...