Home / चंद्रपूर - जिल्हा / सावली / *पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या...

चंद्रपूर - जिल्हा    |    सावली

*पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच काँग्रेसचा विजय: विजय वडेट्टीवार* *व्याहाड खुर्द येथे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न*

*पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच काँग्रेसचा विजय: विजय वडेट्टीवार*    *व्याहाड खुर्द येथे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न*

*पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच काँग्रेसचा विजय: विजय वडेट्टीवार*

 

व्याहाड खुर्द येथे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

 

✍️दिनेश झाडे

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

 

सावली :- नुकतेच देशात लोकसभा निवडणूक २०२४ पार पडले यात काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीला लोकांकडून जोरदार समर्थन बघावयास मिळाले,त्यातच गडचिरोली - चिमूर लोकसभा इंडिया आघाडी प्रणित काँग्रेस पक्षाचे उमेदवार  मा.डॉ.नामदेव किरसाण हे आपले प्रतिस्पर्धी अशोक नेते यांच्यापेक्षा १ लक्ष ४०००० मताने खासदारपदी निवडून आले याकरिता विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी संपूर्ण लोकसभेची जबाबदारी घेतली होती व त्यात यांना यश मिळाले. तालुका काँग्रेस कमिटी सावली तर्फे मौजा.व्याहाड खुर्द येथे कार्यकर्ता आढावा बैठक आयोजित करण्यात आली असता विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी भेट दिली व समस्त पदाधिकारी व कार्यकर्तागणं यांचे आभार मानत पूढील निवडणूकीत यापेक्षाही अधिक मेहनत करावी व काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी प्रदान करावी असे प्रोत्साहन केले.प्रसंगी काँग्रेस पक्षाचे माजी बांधकाम सभापती मा.दिनेश पाटील चिटणुरवार,तालुका अध्यक्ष मा.नितिन गोहने,महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा.हिवराज पाटील शेरकी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव मा.बंडू पाटील बोरकुटे,शहर अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यलवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,माजी पंचायत समिती सभापती मा.विजय कोरेवार,युवा तालुका अध्यक्ष मा.किशोर कारडे,युवा विधानसभा उपाध्यक्ष मा.नितीन दुवावार,कृषी उत्पन बाजार समिती संचालक मा.निखिल सुरमवार, जेष्ठ काँग्रेस महिला पदाधिकारी सौ.उर्मिला तरारे,सौ.रुपाली कन्नाके, महिला शहर अध्यक्ष सौ.भारती चौधरी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ता गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकर्ता आढावा सभेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याचे अभिनंदन करताना विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी "सावली तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जवळपास ५००० पर्यंत लीड मिळवून दिली, दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्व पदाधिकारी व कार्यकर्तागणं यांची विशेष भूमिका आहे ज्या काही बूथावर आपण मागे पडलो आहो त्याकडे अधिक लक्ष्य देऊन पुन्हा जोमाने काम करावे भविष्यात होणाऱ्या विधानसभा,विधान परिषद,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकात काँग्रेस पक्षाला नंबर एकवर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे" असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केली आहे.कार्यकर्ता आढावा बैठकीला सावली तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्तागण मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.रुपेश किरमे,प्रस्तावना तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने,तर आभार जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्राम काँग्रेस कमिटी व्याहाड खुर्द येथील समस्त पदाधिकारी व कार्यकर्तागणं यांचे विशेष सहकार्य लाभले.

ads images

ताज्या बातम्या

धनगर समाजाचे प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित   19 June, 2024

धनगर समाजाचे प्रवीण काकडे महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

यवतमाळ:प्रवीण काकडे यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील महान कार्याबद्दल महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन सन्मानित...

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे 19 June, 2024

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण 18 June, 2024

भालर ग्रामवासीयांचे हारमोनी मिनरल्स व राॅकवेल मिनरल्स कंपनी विरोधात आमरण उपोषण

वणी:आचारसंहितेच्या काळात गटविकास अधिकारी,वणी यांनी हारमोनी मिनरल्स कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक...

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक* 18 June, 2024

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक*

*नोंदणी निबंधक कोरपना कार्यालयाला दलालाचा विळखा ? शेतकऱ्याची होत आहे फसवणूक* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधीकोरपना:-कोरपना...

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या* 18 June, 2024

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या*

*मोहर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-तालुक्यातील मोहर्ली येथे...

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या. 18 June, 2024

मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने केली आत्महत्या.

वणी: तालुक्यातील मोहुर्ली येथे १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दिनांक१८ जूनला सकाळी...

सावलीतील बातम्या

*विविध विकास कामांसंदर्भात पंचायत समिती,सावली येथे आढावा बैठक* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती*

*विविध विकास कामांसंदर्भात पंचायत समिती,सावली येथे आढावा बैठक* *विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती* ✍️दिनेश...

*तब्बल १० वर्षांनी काँग्रेसच्या उमेदवाराने जिंकली गडचिरोली लोकसभेची जागा* *काँग्रेस पक्षाचे डॉ.नामदेवराव किरसाण १ लाख ४० हजार २३४ मतांनी विजय*

*तब्बल १० वर्षांनी काँग्रेसच्या उमेदवाराने जिंकली गडचिरोली लोकसभेची जागा* काँग्रेस पक्षाचे डॉ.नामदेवराव किरसाण...

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका*

*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...