Home / चंद्रपूर - जिल्हा / जिल्हा परिषद चंद्रपूर...

चंद्रपूर - जिल्हा

जिल्हा परिषद चंद्रपूर व्दारे प्राथमिक आरोग्य केंद्रांना 63 ऑक्सिजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांचे वितरण..

जिल्हा परिषद चंद्रपूर व्दारे प्राथमिक आरोग्य केंद्रांना 63 ऑक्सिजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांचे वितरण..

"डाॅक्टरांचे कार्य हे देवा सारखे - संध्याताई गुरनुले

चंद्रपूर दि. 22 मे :  जिल्हा परिषद,चंद्रपूर येथे कोरोना प्रतिबंधक सर्व दक्षता पाळून घेतलेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रांना आॅक्सीजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, उपाध्यक्ष तथा ,आरोग्य समिती सभापती रेखाताई कारेकार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती सुनिल उरकुडे, महिला व बालकल्याण समिती सभापती रोशनी खान, जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरसकोल्हे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिल कलोडे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.प्रकाश साठे उपस्थित होते.

कोरोना विषाणू आजाराचे नियंत्रणाकरिता जिल्हा परिषद,चंद्रपूरचा सुरवातीपासूनच सहभाग राहिलेला आहे. या अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे पुढाकाराने पंचायत विभागामार्फत पंधरावे वित्त आयोगाचे ५८ लक्ष अनुदान उपलब्ध करून देण्यात आले.यामधून ग्रामिण भागातील जनतेस आकस्मिक परिस्थितीत आॅक्सीजन सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता आॅक्सीजन काॅन्सण्ट्रेटर उपकरणांची खरेदी करण्यात आली. या उपकरणांचे वितरण जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मागील वर्षी पासून कोविड नियंत्रणाकरिता अहोरात्र झटणारे डाॅक्टर्स,आरोग्य कर्मचारी हे देवा सारखेच आहेत असे भावपूर्ण उदगार त्यांनी काढले.यावेळी चंद्रपूर तालुक्याच्या तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.माधुरी मेश्राम, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापुर चे वैद्यकीय अधिकारी डाॅ.अमित जयस्वाल, प्राथमिक आरोग्य केंद्र चिचपल्ली च्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.श्रध्दा माटुरवार यांनी साहित्य स्विकारले.

जिल्हा आरोग्य अधिकारी  डाॅ.राजकुमार गहलोत यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे संचलन सेवानिवृत्त जिल्हा आयुष अधिकारी डाॅ.गजानन राऊत यांनी केले.कार्यक्रमाकरिता प्रशासन अधिकारी शालिक माऊलीकर,जिल्हा औषधनिर्माण अधिकारी किशोर नेताम, साथरोग वैद्यकिय अधिकारी डाॅ.मिना मडावी,आरोग्य पर्यवेक्षक अब्दुल वहाब कुरेशी व  सुभाष सोरते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सहकार्य केले.

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...