Home / चंद्रपूर - जिल्हा / वाघाच्या हल्ल्यात शेतकरी...

चंद्रपूर - जिल्हा

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, तालुक्यातील सलग तिसरी घटना 

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, तालुक्यातील सलग तिसरी घटना 

गेवरा बिटातील जनता भयभीत

सावली: सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत गेवरा परीक्षेत्रात कक्ष क्रमांक १५४ मध्ये काल तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा घेऊन बसलेल्या वाघाने हल्ला करुन जखमी केले तर त्याच्या शोधार्थ सकाळी गेलेल्या वनविभागाच्या टिम मधील वनरक्षक संदीप चुदरी यांना जखमी केले ,तर दुपारच्या ४ वाजता सुमारास निफंद्रा येथील रामा मारबते(६०) नामक शेतकरी पाळीव जनावरांना चारा आणण्यासाठी गेला असता मंगळमेंढा रोड वरील फिल्टर लाईन च्या जवळ शेतक-यावर दबा घेऊन बसलेल्या वाघाने हल्ला चढवुन ठार केले,अक्षरशः त्याचे धड वेगळे केले, वडील आले नाही म्हणुन गावातील काही नागरिकासह मुलगा गेला असता वाघाच्या हल्ल्यात ठार झालेले दिसुन आले ,लगेच याची माहीती वनविभागाला देण्यात आली, वनकर्मचारी घटनास्थळी पोहचले चौकशी अंत वाघाच्या हल्ल्यात हा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून सलग तालुक्यातील तिस-या घटनेमुळे गेवरा बिटासह तालुक्यातील जनता भयभीत झाली आहे.
जंगलव्याप्त भागात नेहमीच हिंस्त्र वन्यप्राणी वाघ,बिबट यांचा वावर असतो ,शेतक-यांचे जमीन जंगलालगत असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असताना वनविभागाने यांचा बंदोबस्त करावा, कुंपणाची व्यवस्था करावी ,व हल्ल्यात मृत झालेल्या शेतकरीस तात्काळ मदत देण्याची मागणी जोर धरत आहे

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...