Home / महाराष्ट्र / ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार...

महाराष्ट्र

ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर व्यापा-यांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भात अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर व्यापा-यांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भात अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर व्यापा-यांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भात अॅड. चैतन्य भंडारी यांचे व्याख्यान

 

✍️जगदीश का. काशिकर

 व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

धुळे :-धुळे ऑईल सीडस् क्रशर्स असोसिएशन, धुळे यांच्यातर्फे हॉटेल गणपती पॅलेस येथे अॅड. चैतन्य भंडारी यांचे ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ऑनलाईन बँकेतील गैरव्यवहार या विषयावर बोलतांना अॅड. चैतन्य भंडारी यांनी विविध मुद्दे मांडले व ऑनलाईन बँकींगचे व्यवहार करतांना, एटीएम / डेबीट कार्ड वापरतांना नागरिकांकडून ब-याचशा चुका होतात व त्याबाबत काय सावधानता बाळगली पाहिजे या संदर्भात त्यांनी त्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले व विविध मार्गदर्शनपर सूचना त्यांनी केल्या. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, कुठलीही बँक तुम्हाला स्वतःहून कॉल करीत नाही म्हणून तुम्ही बँकेच्या नावाने येणा-या फोन कॉलला प्रतिसाद देवू नका, त्यांना आपले ओटीपी शेअर करु नका तसेच कोणतेही थर्ड पार्टी अॅप्लीकेशन डाऊनलोड करु नका, सध्या मोबाईलवर वेगवेगळया प्रकारचे बनावट एस. एम. एस. येत असतात त्याव्दारे हॅकर्स सर्वसामान्य जनतेची आर्थिक व मानसिक छळवणुक करीत आहे. आता एक नविन बनावट एस.एम.एस. मोबाईलवर येत आहे तो म्हणजे "तुमचे बँक अकाऊंट लवकरच बंद होणार आहे' जे लोक ऑनलाईन बँकेच्या सर्वाधिक वापर करतात त्यांना याचा सर्वात जास्त फटका बसत आहे. हे ऑनलाईन बँक अकौंट जर सुरु ठेवायचे असेल तर तुम्हाला हॅकर्स एक लिंक पाठवतात, त्या लिंकला आपण क्लिक करताच आपली वैयक्तिक माहिती विचारली जाते व सदरील लिंक ही एका प्रकारे वायरसचे काम करते जेणेकरुन मोबाईलधारकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, नेट बँकींगचे डिटेल्स, पासवर्ड, आपले बँकेचे ऑनलाईन डिटेल्स, वैयक्ति माहिती याबाबतचे सगळे अपडेटस् हे या हॅकर्सकडे चालले जाण्याची शक्यता असते. त्याव्दारे हे सायबर गुन्हेगार आपली फसवणूक करतात. जर आपले कुठल्याही प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार असेल तर त्याबाबत सरळ संबंधित बँकेतच चौकशी करावी. कोणतीही बँक ग्राहकाला अशी लिंक पाठवत नाही आणि अशा प्रकारचे जर मॅसेज आले असतील किंवा लिंक आली असेल तर संबंधित बँकेतच जावून त्यासंदर्भात अधिक माहिती घ्यावी. तोपर्यंत अशा कोणत्याही लिंकवर नागरीकांनी क्लिक करु नये व सदरील मॅसेजला प्रतिउत्तर देवू नये. तसेच शक्यतो १५-२० दिवसांनी आपण आपले बँकिंग संदर्भातील पासवर्ड हे बदलत रहावे, फोन मध्ये आपले पासवर्ड, बँकिंग डिटेल्स इ. माहिती सेव्ह करु नये किंवा फोन कॉन्टॅक्ट मध्ये देखील आपले बॅकींग डिटेल्स सेव्ह करुन ठेवू नये व आपल्यासोबत असे गुन्हे झाले असल्यास टोल फ्री नंबर १९३० वर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे. याप्रसंगी धुळे ऑईल सीडस् कशर्स असोसिएशनचे अध्यक्ष सर्वश्री सुनिल अग्रवाल, उपाध्यक्ष योगेश अग्रवाल, कार्याध्यक्ष किशोर भांगडीया, सचिव अक्षय अग्रवाल, खजिनदार अखिल कनेरीया तसेच बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*                                    13 May, 2024

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ  सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा. 13 May, 2024

वणी शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करा - मनसेची मागणी, १० ते १२ दिवसाआड होत आहे शहराला पाणीपुरवठा.

उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढतं असल्याने शहराला उन्हाच्या चटक्या बरोबर पाणी टंचाईच्या झळा सुध्दा सोसाव्या लागत...

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह. 12 May, 2024

ऑईलमिल फॉक्ट्री मध्ये सरकिच्या ढिगाऱ्यात १० वर्षीय मुलीचा मृतदेह.

वणी:- लालगुडा गावालगत असलेल्या एमआयडीसीमध्ये स्वास्तिक ऑइल मिल कंपनीत एका दहा वर्षाच्या मुलीचा सरकीच्या ढिगाऱ्याखाली...

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

महाराष्ट्रतील बातम्या

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...

धनगर एसटी आरक्षण विषयी कर्नाटक राज्याचा अभ्यास करा

मुंबई : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाला मध्य प्रदेश,...