Home / महाराष्ट्र / मोदींच्या काठी अन्‌...

महाराष्ट्र

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

भाजपच्या निवडणूक स्ट्रॅटेजीनुसार माढा च्या सभेत मोदींचा पिवळा फेटा बांधून काठी अन्‌ घोंगडं देऊन सत्कार करण्यात आला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली असून मोदींच्या ह्याच फोटोवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत त्यामुळे सर्विकडे प्रचार जोरदार पद्धतीने सुरू आहे.महाराष्ट्रात देखील प्रचाराचे वारे जोरदार वाहत आहे. या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उतरले असून ठिकठिकाणी मोदींच्या सभा होत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या  प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (ता. 30 एप्रिल) माळशिरसमध्ये सभा झाली. भाजपच्या निवडणूक स्ट्रॅटेजीनुसार या सभेत मोदींचा पिवळा फेटा बांधून काठी अन्‌ घोंगडं देऊन सत्कार करण्यात आला. माढा लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाची निर्णायक मतदारसंख्या डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने पंतप्रधानांचा धनगरी वेशभूषा देऊन सत्कार केल्याचे उघड वास्तव आहे. परंतु धनगरी वेशभूषेत मोदींचा सत्कार केल्याने समाजामधील नाराजी उफाळून आली आहे. सोशल मीडियावर मोदींचा हाच काठी आणि घोंगडी घातलेला फोटोवर समाजबांधवांनी जोरदार टीका केली आहे.त्याचे कारण आहे धनगर आरक्षण मुद्दा, २०१४ साली सोलापूर येथे सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये देखील अशीच काठी आणि घोंगडी दिले होते त्याप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की "मै जल्दी धनगर आरक्षण के मुद्दे को लेकर, धनगर समाज को एसटी अनुसूचित जमाती का आरक्षण दूंगा" परंतु  दहा वर्षे उलटून गेले तरीही धनगर  समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे आता मोदींचा पुन्हा असाच सत्कार झाल्याने धनगर समाज संतप्त झाला असून त्यांनी मोदींचा काठी आणि घोंगडी या फोटोवर सोशल मीडियावर टीका करून आरक्षणाचे काय झाले असा सवाल मोदींना केला आहे.त्याच बरोबर धनगरांची फसवणूक केल्याचे अनेकांनी मत मांडले आहे. त्यामुळें माळशिरसमध्ये झालेली मोदींची सभा महायुतीला टोकेदुखी ठरण्याची चिन्ह दिसत आहे. 

ताज्या बातम्या

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार 16 May, 2024

अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय देण्याकरिता चक्काजाम आंदोलन, सोनू/संतोष दुबे यांना न्याय द्यावा - अमन अंधेवार

घुग्घुस- १६ मार्चला एच.आर.जी ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालक सोनू उर्फ संतोष दुबे यांचा घुग्घुस मुंगोली चेकपोस्ट जवळ...

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा. 15 May, 2024

वणी येथे मातृदिन उत्साहात साजरा.

वणी:- आई हे ईश्वराचे रूप असतं हे आपल्याला जगमान्य आहे कारण की ती स्वतःला विसरून उत्तमपणे ईश्वरी कार्य करत असते तिच्यात...

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना*    *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*? 15 May, 2024

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* *राज्याचे सत्ताधारी बीएस इस्पातच्या पाठीशी*?

*विधानसभेत पून्हा गाजणार बीएस इस्पात कंपनीचा कोळसा घोटाळा : आमदार सुभाष धोटेंची पून्हा लक्षवेधी सूचना* राज्याचे...

*वंदना विनोद बरडे अधीसेवीका.सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रीय प्रतीभा सन्मानाने पूरस्क्रूत* 15 May, 2024

*वंदना विनोद बरडे अधीसेवीका.सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रीय प्रतीभा सन्मानाने पूरस्क्रूत*

*वंदना विनोद बरडे अधीसेवीका.सामाजिक कार्यकर्त्या राष्ट्रीय प्रतीभा सन्मानाने पूरस्क्रूत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी* 14 May, 2024

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष धोटेंची मागणी*

*बल्लारपूर पेपर मिल कामगारांच्या स्वास्थ व सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष : चौकशी करण्याची आमदार सुभाष...

महाराष्ट्रतील बातम्या

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...

धनगर एसटी आरक्षण विषयी कर्नाटक राज्याचा अभ्यास करा

मुंबई : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाला मध्य प्रदेश,...

*मराठा आरक्षण -चारदा मुख्यमंत्री असणाऱ्यांना महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही* *जयदीप कवाडे यांची शरद पवारांवर नाव न घेता टीका*

*मराठा आरक्षण -चारदा मुख्यमंत्री असणाऱ्यांना महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही* *जयदीप कवाडे यांची शरद पवारांवर...