Home / महाराष्ट्र / *अक्षय भालेराव हत्याकांड...

महाराष्ट्र

*अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी* *प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी घेतली राज्याचे मुख्यमंत्री* *एकनाथराव शिंदे यांची भेट*

*अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी*    *प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी घेतली राज्याचे मुख्यमंत्री* *एकनाथराव शिंदे यांची भेट*

*अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी*

 

*प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी घेतली राज्याचे मुख्यमंत्री* *एकनाथराव शिंदे यांची भेट*

 

✍️मुनिश्वर बोरकर

  गडचिरोली

 

मुंबई:- दिनांक 14 जून

नांदेड जिल्ह्यातील  बोंढार या गावांमध्ये दिनांक 1 जून रोजी जातीय द्वेषभावनेतून घडलेल्या अक्षय भालेराव हत्याकांडाच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा .जोगेंद्र कवाडे यांनी दिनांक 14 जून रोजी मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे.

1जून रोजी बोंढार या गावांमध्ये अक्षय भालेराव या बौद्ध तरुणांनी पहिल्यांदाच गावात भीमजयंती साजरी केल्याचा  राग मनात धरून गावातीलच जातीयवादी गावगुंडांनी त्याची निर्दयीपणे हत्या केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंबेडकरी समाजामध्ये तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली असताना छत्रपती शिवबा -शाहू- फुले -डॉ आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेमुळे अत्यंत व्यथीत झालेल्या प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी सर्वप्रथम 5 जून रोजी अक्षय भालेराव च्या घरी बोंढार या गावी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सात्वन करून हत्या पिढीत कुटुंबाला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार   असल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर दिनांक 14 जून रोजी, दुपारी 3 वाजता.प्रा .जोगेंद्र कवाडे यांनी मुंबई येथे मंत्रालयातील त्यांच्या दालनात मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणी निवेदन सादर केले .आणि राज्यात दिवसेंदिवस मागासवर्गीय बौद्धांवरील वाढत असलेल्या अत्याचारासंदर्भात चिंता व्यक्त करत अशा प्रकारच्या घडत असलेल्या अत्याचारामुळे त्यांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याकरता आणि वाढते अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी माजी खासदार प्रा.

जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सोबत चर्चा करताना केली आहे.

त्याचबरोबर अक्षय भालेराव हत्याकांड प्रकरणाचा तपास हा एस. आय .टी.तपास यंत्रणेदारा केल्या जावा. सदर खटला फास्टट्रॅक कोर्टांतर्गत चालवून हत्यारांना मृत्युदंडाची  (फाशीची) शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसह  हत्या पीडित अक्षय भालेराव कुटुंबाला 25 लाख रुपयाची सानुग्रह मदत देऊन त्याच्या परिवारातील एकाला तात्काळ शासकीय नोकरीत सामावून घेतल्या जावे अशी मागणीही यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाची गांभीर्याने दखल घेत मागासवर्गीयांवरील होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध घालण्याचे दृष्टीने कठोर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतल्या जाईल.जेणेकरून भविष्यात  अशा प्रकारचे अत्याचार घडणार नाही असे सांगून अक्षय भालेराव या हत्यापीडित कुटुंबाला योग्य न्याय दिल्या जाईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री  एकनाथराव शिंदे यांनी चर्चे दरम्यान शिष्टमंडळाशी बोलताना दिले.निवेदन देताना प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव नगरसेवक प्रमोदराव टाले मुंबई प्रदेश संघटक आनंद कडाळे सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती पक्षाच्या वतीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

ताज्या बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

महाराष्ट्रतील बातम्या

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...

धनगर एसटी आरक्षण विषयी कर्नाटक राज्याचा अभ्यास करा

मुंबई : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणप्रश्नी राज्य शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाला मध्य प्रदेश,...