Home / चंद्रपूर - जिल्हा / वेळीच उपचार घेतल्यास...

चंद्रपूर - जिल्हा

वेळीच उपचार घेतल्यास "म्युकरमायकोसिस" आजाराचा धोका टाळता येऊ शकतो - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

वेळीच उपचार घेतल्यास

चंद्रपूर दि. 22 मे : "म्युकरमायकोसिस" हा आजार कोरोना विषाणूमुळे उद्भवणारा एक बुरशीजन्य संसर्ग आहे. हा एक अति जलद पसरणारा बुरशीजन्य रोग आहे. जो मुख्यत: नाक, डोळे आणि मेंदू यांना बाधित करतो. कोरोना आजारातून बरे झालेल्या काही रूग्णांना "म्युकरमायकोसिसचा" धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, तसेच  ज्या रुग्णांना मधुमेह आहे अशा रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. मात्र वेळीच उपचार घेतल्यास "म्युकरमायकोसिस" या आजाराचा धोका टाळता येऊ शकतो. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

कोरोना संसर्गाबरोबरच "म्युकरमायकोसिस" या आजाराने रुग्णांच्या चिंतेत आणखीच भर टाकली आहे. साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते.  प्रामुख्याने हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत फैलावत असल्याचे आढळून येत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर "म्युकरमायकोसिस" हा बुरशीजन्य आजार विशेषत्वाने मधुमेही, मूत्रपिंडाशी संबंधित आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींना होत असल्याचे आढळून येत आहे. अशा व्यक्तींनी सहा आठवड्या पर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

ही आहेत "म्युकरमायकोसिस" आजाराची लक्षणे :

* चेहऱ्याचे स्नायू दुखणे, चेहऱ्यावर बधिरपणा येणे.
*  गाल दुखणे व गालावर सूज येणे.
* तीव्र डोकेदुखी.
* नाकावर सूज येणे,नाक दुखणे व नाक सतत वाहू लागणे.
* चेहरा अथवा डोळ्यांवर सूज येणे व डोळे दुखणे.
* दृष्टी अधू होणे व डोळ्यापुढे दोन प्रतिमा दिसणे.
* दात दुखणे किंवा हलु लागणे.

वरील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व वेळेत उपचार करून घ्यावेत. 

घ्यावयाची काळजी :

* लक्षणे दिसू लागल्यास त्वरित नाक, कान, घसा व दंत तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
* मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियमित तपासून नियंत्रणात असल्याची खात्री करावी.
रक्तातील साखर वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* मास्क नियमित वापरावा व वैयक्तिक स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे.
*डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार नियमित घ्यावेत.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...