Tranding

Reg No. MH-36-0010493

Saturday May 11, 2024

40.69

Home / विदर्भ / नागपूर / महापुरुष हे काही विशिष्ट...

विदर्भ    |    नागपूर

महापुरुष हे काही विशिष्ट जातीचे नाहीत?

महापुरुष हे काही विशिष्ट जातीचे नाहीत?

महापुरुष हे काही विशिष्ट जातीचे नाहीत

 

✍️अंकुश शिंगाडे

   नागपूर

 

           महान माणसं काही एका जातीची नसतात. परंतू माणसांना माणसंच जातीपुरतं मर्यादित करतात.  जसं संत रविदास चांभारांचे, अण्णाभाऊ  साठे मातंगाचे, गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार, चोखाळत महार इत्यादी बरेच महापुरुष जातीचे. काही वर्गही महापुरुषात केले आपण. जसे. शिवाजी महाराज मराठ्यांचे, डॉ भीमराव रामजी आंबेडकर अस्पृश्यांचे, भगवान परशुराम ब्राम्हणांचे. धर्माच्या बाबतीतही हेच रुदन आहे. वर्धमान महावीर जैनांचे, महम्मद पैंगबर मुस्लिमांचे, तसेच येशू ख्रिस्त ख्रिश्चनांचे. हिंदूचे राम क्रिष्ण. मग जातीजातीवरुन भांडणं व धर्मावरुनही भांडणं. अमुकांनी अमुक महापुरुषाला असं म्हणलं तसं म्हणलं. म्हणणारेही अमुक महापुरुष असा, अमुक महापुरुष तसा. मग उगाच वाद. शेवटी ते वाद विकोपाला जातात. महापुरुषांचीही बदनामी होता व महापुरुष एका जातीपुरते मर्यादित होवून जातात.

          वरील प्रकारच्या आपल्या उचापती. कशाला हव्यात असल्या उचापती? त्या महापुरुषांनी तुमचं काय बिघडवलंय. तरीही त्या महापुरुषांच्या नावानं वादळ. त्यातून समजा परशुराम वा सावरकर ब्राम्हणाचे आहेत तर आपण मानायचे नाही,  संत रविदास, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अस्पृश्यांचे असल्याने आपण मानायचे नाही. ही जातीजातीच विसंगती आज पाहायला मिळत आहे. याचाच अर्थ असा की महापुरुषांना जातीजातीत वाटून टाकलं आहे. तशीच आणखी खोलात जावून विचार केला तर असे जाणवते की महित्मा गांधी ब्राम्हण जातीचे आहेत म्हणून अस्पृश्य मानत नाहीत आणि त्यांनी हरिजन अर्थात अस्पृश्यांना किंचीत का होईना,  सहानुभूती दाखवली म्हणून त्यांना सनातन समाज मानत नाही. एवढेच नाही तर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगूनही म्हणणारे म्हणतात की सावरकरांनी ब्रिटीशांची लाळ घोटली सुटण्यासाठी. काही काही वीर तर अंदमानाची काळी शिक्षा भोगत भोगतच मरण पावले. परंतू काही का असेना सावरकरांना शिक्षा झाली हे काही खोटे आहे का? त्यातच खरा इतिहास माहीत करुन न घेता कोणी म्हणतात की बाबासाहेब तुरुंगातच गेले नाही. तेही ब्रिटीशांची मनधरणी करीत होते. परंतू खरा इतिहास असा आहे की मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यात बाबासाहेबच बोलले होते ब्रिटीशांना इतकंच नाही तर ब-याचशा प्रसंगात बाबासाहेबांनी इंग्रज सरकारला फटकारलं होतं.

         डॉ. बाबासाहेबांनी केवळ विशिष्ट जातीचा विचार केला नाही.  त्यांनी आपल्या जातीसाठी संविधानात कलम लिहिण्यापुर्वी कलम ओबीसी साठी पहिलं लिहिली. एवढंच नाही तर त्यांनी मनुस्मृती केवळ अस्पृश्यच नाही तर सर्व लोकांसाठी विशेषतः स्रियांसाठी चांगली नाही, मग ती ब्राम्हण का असेना, हे दाखवून त्यांनी ती तेही बाबासाहेब सहस्रबुद्धे सारख्या महाडातीलच एका ब्राह्मण व्यक्तीला महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनादरम्यान दहन समीतीचे अध्यक्ष स्थान देवून जाळली. तसंच समाजातील हा भेदभाव दूर व्हावा म्हणून त्यांनी त्या काळातील ब्राम्हणांना सोबत घेवून सविताशी विवाह केला. तसंच ती जरी ब्राम्हण असली तरी तिनंही भेदभाव केला नाही तर तिनं बाबासाहेबांची अविरत सेवा केली. म्हणून बाबासाहेब संविधान लिहू शकले. कोणी म्हणतात की सवितानं बाबासाहेबांना मारलं. परंतू ही शंभर प्रतिशत चुकीची गोष्ट आहे. तिला मारायचंच असतं तर ज्यावेळेस बाबासाहेब संविधान लिहित होते. तेव्हाच मारलं असतं.

         बाबासाहेब हे विशिष्ट जातीपुरते मर्यादित नाहीत. कारण जातीवरुन सांगतो की त्यांना उच्चवर्णीयांनी महाडच्या सत्याग्रहात मदत केली. त्यात, ब्राम्हण मराठा आणि इतरही समाज होता. महत्वपुर्ण गोष्ट सांगायची म्हणजे बाबासाहेबांनी केवळ आपल्याच समाजासाठी कार्य केले नाही तर सर्वांसाठीच कार्य केले. त्यात मग ती महार जात असो की ब्राम्हण. मनुस्मृती भाला संग्राम दहन करुन बाबासाहेबांनी केवळ अस्पृश्यच जातीच्या स्रियांचा विचार केला नव्हता तर त्यात ब्राम्हण जातीच्याही आणि इतरही जातीच्या स्रियांचा विचार केला होता. तसाच विचार संविधान लिहितांनाही केल्या गेला.

          ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी कार्य करतांना केवळ आपलीच जात पाहिली नाही तर इतरही जातीचा विचार केला. तेच कार्य इतरही महापुरुषांनी केले. त्यांत मग संत सावता असो, संत गोरा  असो, संत ज्ञानेश्वर असो, संत चोखा असो वा संत रविदास. तसेच ते महात्मा गांधी असो,  न्यायमुर्ती रानडे असो, राजा राम मोहन राय असो वा सावरकर असो. प्रत्येकांनी आपापल्या परीनं केवळ आपल्या जाती आणि धर्मासाठीच कार्य केले नाही तर सर्व जाती आणि धर्मासाठीच कार्य केले. मग असे असतांना आम्ही अमुक महापुरुष या जातीचा अमुक महापुरुष त्या जातीचा,  अमुक महापुरुष या धर्माचा अमुक महापुरुष त्या धर्माचा असा भेदभाव का करतो?  ते कळत नाही. आपण याबाबत सखोल विचार करायला पाहिजे. तसेच त्यानुसार वागायला पाहिजे.

 विशेष सांगायचं म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं की ज्याला आपण परमेश्वर म्हणतो. तो परमेश्वर एकच आहे. प्रत्येक जाती आणि धर्मातील परमेश्वर वेगवेगळे नाहीत. मग तो राम असो,  येशू ख्रिस्त असो,  मोहम्मद पैगंबर असो वा आणखी इतर कोणता असो. हं,  भांडणं करण्यासाठी नक्कीच वेगवेगळे असू शकतात हे तेवढंच खरं. तसेच महापुरुषही वेगवेगळे नाहीत हेही तेवढंच खरं. महापुरुषांचा जन्म म्हणजे त्या त्या काळात भरकटलेल्या लोकांना योग्य दिशा दाखविण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरानं आपले दूत पाठवणं होय. हे महापुरुष म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचे दूतच आहेत. हिंदू धर्मानुसार अवतार, मुस्लिम धर्मानुसार परमेश्वराचे दूत तर ख्रिश्चन धर्मानुसार प्रत्यक्ष देवाचे पुत्र  असं मानता येईल. हे महापुरुष केवळ एका जाती वा धर्मासाठी कार्य करीत नाहीत. ते विश्वातील समस्त जातीसाठी कार्य करतात. हं,  मान्य करावं लागेल की जन्म एका विशिष्ट जातीत वा धर्मात होवू शकतो. मात्र त्यांचे कार्य.......त्यांचे कार्य हे विशिष्ट जाती वा धर्मासाठी राहात नाही. ते कार्य वैश्विक असतं. त्यामुळंच कोणीही आजपासून तरी महापुरुषांना विशिष्ट जाती वा धर्मापुरतं बंधन घालू नये. ते महापुरुषही त्यांच्या त्यांच्या कार्यानुसार वैश्विक असतात हे तेवढंच खरं. मग जगातील कोणतेही महापुरुष,  साधू,  संत का असेना. त्यात प्राचीन अर्वाचीन सारेच आले. त्यामुळं कोणीही महापुरुषावरुन भांडणं करु नये. महापुरुषांबाबत जात, धर्म पाहू नये. त्यानं कोणते कार्य केले? ते कार्य चूक होते की बरोबर हेही पाहू नये? हं चूका झाल्याही असतील किरकोळ. आपल्या होत नाहीत का? त्यांच्याही झाल्या असतील. परंतू त्या चुका पाहण्याचा आपल्याला मुळात अधिकार नाही. कारण ते कार्य त्या काळानुसार बरोबर होते हे तेवढंच खरं. आज जर चुका पाहायच्या असेल तर आपल्या पाहा. कारण त्या चुका आज आपल्याला सुधरवता येवू शकतात. मात्र विनाकारण महापुरुषावरुन महापुरुषांच्या चुका काढून त्यांना विशिष्ट जाती धर्मात वेढून वादळ निर्माण करु नये. कारण आपल्याला भांडण करता यावं म्हणून  महापुरुषांनी जाती धर्मावरुन कोणताच भेदभाव केला नाही. त्यांनी हे  विश्वची माझं घर म्हणत सर्वांच्या एकोप्याचा विचार केला. सर्वांच्या कल्याणासाठी कार्य केले हे तेवढंच खरं. मग ते कोणत्याही जाती धर्मातील महापुरुष का असेना. महापुरुष काही एका विशिष्ट जाती धर्माचे नाहीत. म्हणून  आपणही त्या त्या महापुरुषांना तेवढाच सन्मान द्यावा. मग ते महापुरुष कोणत्याही जाती वा धर्माचे का असेना. हेही तेवढंच खरं आहे.

 

अंकुश शिंगाडे नागपूर                ९३७३३५९४५०

ताज्या बातम्या

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने  मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना*

*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे*    *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना* 11 May, 2024

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* *नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या :आ. सुभाष धोटेंच्या वेकोली प्रशासनाला सुचना*

*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्‍यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन. 11 May, 2024

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य स्थानांतरण सोहळा संपन्न, विजय बाबू चोरडिया यांचे हस्ते उद्घाटन.

वणी:- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर श्री. धनलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत संस्था, वणी रजि.नं.११६२ चा स्थानांतरण व...

*भद्रावतीत  श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य  भव्य शोभायात्रा*    *७१  भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग* 10 May, 2024

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* *७१ भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांचा सहभाग*

*भद्रावतीत श्री सदगुरु संत पादुका पुजन, दर्शन व सत्संग सोहळ्या निमित्य भव्य शोभायात्रा* ७१ भजनी दिंड्यांसह...

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली. 10 May, 2024

भगवान परशुराम जयंती निमित्त रॅली.

वणी:- भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात दुचाकी रॅली चे आयोजन १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता स्थानिक जैताई...

नागपूरतील बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते*

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन*

*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया*

*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...