Home / विदर्भ / गडचिरोली / प्रा.डॉ. नोमेश मेश्राम...

विदर्भ    |    गडचिरोली

प्रा.डॉ. नोमेश मेश्राम यांच्या कवितासंग्रहाला मराठी साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

प्रा.डॉ. नोमेश मेश्राम यांच्या कवितासंग्रहाला  मराठी साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

प्रा.डॉ. नोमेश मेश्राम यांच्या कवितासंग्रहाला मराठी साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर*

 

✍️मुनिश्चर बोरकर

   गडचिरोली

    गडचिरोली:-विदर्भातील प्रसिद्ध कवी व गझलकार प्रा.डॉ. नोमेश नारायण मेश्राम यांच्या राजहंस प्रकाशन पुणे या महाराष्ट्रातील मातब्बर प्रकाशन संस्थेतर्फे जुलै २०२३ मध्ये प्रकाशित 'रक्तफुलांचे ताटवे' या कवितासंग्रहाला अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ ठाणेचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार २०२३ जाहीर झाला आहे. ठाणे येथील प्रसिद्ध मराठी साहित्य मंडळाच्या वतीने दरवर्षी राज्यातील उत्कृष्ट काव्यसंग्रहाला हा पुरस्कार दिला जातो.साहित्य परीक्षण समितीने ४६५ पुस्तकांतून प्रा.डॉ. नोमेश  नारायण मेश्राम यांच्या कवितासंग्रहाची निवड केल्याचे संयोजन समितीने कळविले आहे. रविवार दि.२५  फेब्रुवारीला अखिल भारतीय  मराठी साहित्य मंडळाच्या साहित्य संमेलनात त्यांना  हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.ब्रम्हपुरी येथे वास्तव्यास असलेले प्रा.डॉ. नोमेश नारायण मेश्राम हे आरमोरीच्या महात्मा गांधी महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे विभागप्रमुख आहेत. त्यांच्या 'रक्तफुलांचे ताटवे' या कवितासंग्रहाला  सलग पाचवा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार मिळाला असून शेगाव येथील स्व.बाबुराव पेटकर काव्य सन्मान,नागपूर येथील साहित्यविहार संस्थेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार,मुक्ताईनगर जळगाव येथील उज्जैनकर फाउंडेशनचा तापी पूर्णा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार,आर्वी येथील देवकाई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...