Home / विदर्भ / गडचिरोली / *शिव प्रासादिक नाट्य...

विदर्भ    |    गडचिरोली

*शिव प्रासादिक नाट्य कला मंडळ देऊळगावच्या वतीने संगीता ठलाल यांचा सत्कार*

*शिव प्रासादिक नाट्य कला मंडळ देऊळगावच्या वतीने संगीता ठलाल यांचा सत्कार*

*शिव प्रासादिक नाट्य कला मंडळ देऊळगावच्या वतीने संगीता ठलाल यांचा सत्कार*

 

✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली.

 

कुरखेडा:-दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा खास मंडई निमित्त दु:ख एक यातना  या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.  सोबतच सत्कार समारंभाचे सुद्धा  आयोजन करण्यात आले होते. निवडक सत्कारमूर्ती  मध्ये  मुळ  निवासी असलेल्या  देऊळगाव येतील कुरखेडा येथे सध्या वास्तव्यास असलेल्या   कवयित्री ,साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्यां संगीता संतोष ठलाल यांची  सत्कारमूर्ती म्हणून निवड करण्यात  करण्यात  आली  .त्या शुभ प्रसंगी मंडळाने संगीता ठलाल यांना प्रास्ताविक भाषण करण्याची संधी दिली त्यावेळी संगीता ठलाल यांनी प्रास्ताविक भाषणासोबतच आपले मनोगत सुद्धा व्यक्त करताना म्हणाले की, आजपर्यंत माझे बरेच सत्कार झाले त्यांनी मला प्रोत्साहन दिले  पण, आज माझ्या गावात , आमच्या गावची सून म्हणून  मंडळाच्या व गावाच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन माझा  सत्कार  केले तो सत्कार माझाच नसून  माझ्या पतीचा  आहे, माझ्या कुटुंबाचा आहे, माझ्या गावाचा आहे व खास करून सर्व  नारिशक्तीचा आहे. प्रत्येक घरातील पुरूषांनी आपल्या घरात असलेल्या  मुलींच्या , पत्नीच्या अंगातील सुप्त गुण ओळखले पाहिजे,त्यांना साथ दिली पाहिजे  हि  आज काळाची गरज आहे.  सत्कार होताना  पाहून त्या गहिवरून गेल्या हा सत्कार माझ्यासाठी आशीर्वाद  आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत ऋणात राहीन म्हणून शिव प्रासादिक मंडळाचे, महिला मंडळाचे व देऊळगाव वासियांचे धन्यवाद मानले. झाडीपट्टी मराठी रंगभूमी वडसा दु:ख एक यातना या  नाटकाच्या लेखकाला व सर्व कलावंतांना   शुभेच्छा दिल्या  त्यावेळी उद्धाटक म्हणून डॉ.नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र आदिवासी काँग्रेस, पि आर आकरे माजी जि.प.सदस्य जिवन भाऊ नाट माजी जि.प.उपाध्यक्ष, सत्कारमूर्ती   पद्मश्री डॉ.परशुराम खुणे,कृष्णाजी गजबे आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र, चांगदेव फाये,नवनाथ धाबेकर,राजन पाटील खुणे,पि,एस आय राजू गावळे,आशाताई कुमरे, सत्कारमूर्ती ओमकार ठलाल  तसेच बरेच विशेष अतिथी, प्रमुख अतिथी  , रंगमंचपुजक, निवडक  सत्कार मूर्ती  ,गावकरी मंडळी,  रसिक श्रोते व मंडळाचे अध्यक्ष मनोज खुणे,उपाध्यक्ष मुरली नरोटे,सचिव दुधराम उईके, सर्व पदाधिकारी व महिला वर्ग  उपस्थित होते.

ताज्या बातम्या

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन 16 May, 2024

उद्या मांगली येथे निःशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन

झरी जामनी: तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व्यवसाय स्थापन झाले आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगार...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...