Home / विदर्भ / गडचिरोली / *मैत्री कट्टा कविमनाचा...

विदर्भ    |    गडचिरोली

*मैत्री कट्टा कविमनाचा साहित्य समूहाचे दुसरे साहित्य संमेलन नागपूर येथे थाटामाटात संपन्न*

*मैत्री कट्टा कविमनाचा साहित्य समूहाचे दुसरे साहित्य संमेलन नागपूर येथे थाटामाटात संपन्न*

*मैत्री कट्टा कविमनाचा साहित्य समूहाचे दुसरे साहित्य संमेलन नागपूर येथे थाटामाटात संपन्न*

 

 

✍️मुनिश्चर बोरकर

   गडचिरोली

 

कुरखेडा :-मैत्री कट्टा कवी मनाचा साहित्यसमूहाचे दुसरे साहित्य संमेलन दि.२८/०१/२०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर , उरुवेला कॉलनी छत्रपती चौक नागपूर येथे मोठ्या थाटामाटात पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन अल्का धोंडणे- साखरे (समूह संस्थापिका मैत्रीकट्टा कवी मनाचा)यांनी केलं होतं . कार्यक्रमाचे  उद्घाटन श्री कैलाश धोंडणे ( वनपरिक्षेत्र अधिकारी, ब्रह्मपुरी) व सौ. प्राची धोंडणे  (नगरसेविका कुरखेडा ) यांनी केलं. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आवटे  (कवी व साथरोग तज्ञ ) डॉ. संजय कार्लेकर  ( किटक शास्त्रज्ञ), सौ. संगीता ठलाल ( कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या), श्री अस्तीन चौरे (प्रसिद्ध कवी ), श्री.अनिल  प्रल्हाद साखरे ( केंद्रप्रमुख जि. प. छ. संभाजीनगर ) मा.शोभा वेले ( कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या ) डॉ. यमुना नाखले (कवयित्री / विचारवंत) , तसेच संमेलनाध्यक्ष मा. अशोक बिरबल कांबळे  ( ज्येष्ठ साहित्यिक) , कवीसंमेलनाध्यक्ष मा.वैभव धर्माधिकारी ( व्याख्याते तथा सदस्य साहित्य विचारपीठ मुंबई ) ,अल्का साखरे - धोंडणे  (संस्थापिका / अध्यक्ष मैत्री कट्टा कवी मनाचा ) उपस्थित होते . मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.पहिल्या सत्रामध्ये साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या साहित्यिकांचा काव्यरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच याप्रसंगी अल्का साखरे - धोंडणे लिखित प्रीतगंध काव्यसंग्रह , प्रभात पुष्प सुविचार संग्रह व संगीता रामटेके लिखित वेदनेचं काहूर काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. प्रीतगंध या काव्यसंग्रहावर भाष्य करताना . मा. संतोष मेश्राम यांनी  कवयित्रीच्या अंतरंगातील भावभावनांना काव्यात सुंदररीत्या गुंफण केलेलं सांगितलं तर प्रभातपुष्पावर भाष्य करताना मा. संगीता ठलाल यांनी अशा सुविचारांची आज जगाला गरज आहे हे सांगितलं. डॉ. आवटे यांनी कविता कशी  असावी यावर मोलाचं मार्गदर्शन केलं तर उद्घाटक मा. कैलाश धोंडणे सरांनी सर्व स्तरातून कवितेचे लिखाण व्हावं असं सांगितलं . मा. प्राची धोंडणे यांनी सर्व साहित्यिकांना पुढील उज्वल साहित्य लेखनासाठी शुभेच्छा दिल्या तर साहित्य संमेलनाध्यक्ष मा. अशोक बिरबल कांबळे यांनी सर्वांना दर्जेदार कविता लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या .दुसऱ्या सत्रात कवीसंमेलन मा. वैभव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलं.जवळजवळ ४० कवी/ कवयित्रींच्या उत्कृष्ट रचनांची ,गझलांची मेजवाणीच या वेळेला ऐकण्यास मिळाली. सरते शेवटी कवीसंमेलनाध्यक्ष मा. वैभव धर्माधिकारी यांनी कविता व  चारोळीविषयी मार्गदर्शन करतांना कविता लिहिणे म्हणजे  केवळ यमक जुळवणे नसून त्याचा मतितार्थ , भावार्थ त्या कवितेतून समजावा अशी कविता /चारोळी असावी असे सांगितलं. या कार्यक्रमात पहिल्या सत्राचं मा. संतोष मेश्राम यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं तर दुसऱ्या सत्रात चेतना तळवेकर  यांनी उत्कृष्ट संचालन व आभार प्रदर्शन केलं .या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील काळमेघ यांच खूप मोलाचं सहकार्य लाभलं तसेच डॉ .यमुना नाखले मॅडम यांचही सहकार्य लाभलं . संचालिका मा. वैशाली साळुंखे मॅडम यांच्याही शुभेच्छा संमेलनाला मिळाल्या. त्याचप्रमाणे सुनील तरारे यांची कलात्मक रांगोळी सर्वांना मोहवून गेली. आयोजना संबंधी  सोपविलेली जबाबदारी समूह संचालक संतोष मेश्राम यांनी योग्यरित्या पार पाडली. संमेलन यशस्वी करण्यासाठी  सर्वच आयोजक व संचालक  मंडळांनी खूप मेहनत घेतली. सर्व उपस्थित कवी/कवयित्री व मान्यवर यांनी अल्का धोंडणे- साखरे यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

गडचिरोलीतील बातम्या

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "धरती आबा : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा" या नाटकास पुरस्कार जाहीर.* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता...